कडलास (ता. सांगोला) : सांगोला तालुक्यातील कडलास परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी पावसामुळे भटक्या व विमुक्त समाजाच्या वस्तीत पाणी शिरून तेथील गोरगरीब नागरिकांच्या संसाराचे मोठे नुकसान झाले. अनेक कुटुंबांची घरे उघड्यावर आली, तर अन्नधान्य, कपडे आणि रोजच्या गरजेच्या वस्तू पावसाच्या पाण्यात वाहून गेल्या. परिस्थिती इतकी बिकट होती की नागरिकांकडे दिवस काढण्यासाठीसुद्धा अन्नधान्य उरले नव्हते.
ही दयनीय अवस्था कळताच माजी आमदार व शिवसेना उपनेते शहाजी बापू पाटील यांनी तत्काळ कडलासला धाव घेतली. त्यांनी प्रभावित वस्तीत जाऊन ग्रामस्थांची विचारपूस केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना दिलासा दिला. या प्रसंगी ग्रामस्थांनी सांगितले की, “आमचे सर्व अन्नधान्य, कपडे, भांडी-पातेली पाण्यात वाहून गेले आहेत. मुलाबाळांसाठी खाण्याचा प्रश्न निर्माण झाला हे समजून शहाजी बापूंनी तातडीने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यांनी प्रशासनालाही सूचित करून मदतकार्य त्वरीत सुरू करण्याचे निर्देश दिले.
शहाजी बापू पाटील यांच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या वतीने रविवारी कडलास येथील बाधित कुटुंबांना तीन आठवड्यांचा पुरेल असा जीवनावश्यक शिधा वाटप करण्यात आला. मदत कार्यात शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय दादा पाटील, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सागर दादा पाटील, सांगोला तालुका शिवसेनाप्रमुख दादासाहेब लवटे, युवासेना तालुकाप्रमुख दिपक खटकाळे, शिवसेना मागासवर्गीय सेलचे दिपक ऐवळे, शिवसेना सोशल मीडिया प्रमुख अमित पाटील तसेच स्थानिक शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता
बाधित कुटुंबांना खालील जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेला शिधा देण्यात आला :25 किलो गहू, 2 किलो बासमती तांदूळ, 2 किलो साखर, खाद्यतेल चिरमुरे, फरसाण, बिस्किटे, चहा पावडर, मिरची पावडर, विविध मसाले
पोहे, मीठ, गहू डाळ, मटकी डाळ, तूर डाळ बटाटे, टोमॅटो, कोबी, हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर याशिवाय युवासेना तालुकाप्रमुख गुंडा दादा खटकाळे यांनी 100 कुटुंबांना चटया व ब्लँकेटचे वाटप केले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला.
कार्यक्रमादरम्यान सांगोला तालुका शिवसेनाप्रमुख दादासाहेब लवटे म्हणाले,शिवसेना ही 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करणारी पक्षसंस्था आहे. नुसतेच गुडघाभर पाण्यात फिरून, फोटोसेशन करून नागरिकांना दिलासा मिळत नाही. त्यांच्या अडचणीत प्रत्यक्ष उतरून, त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आवश्यक मदत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. आमचे नेते शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हा छोटासा प्रयत्न केला असून, पुढेही नुकसानग्रस्तांना लागेल ती मदत करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे
कडलासमधील भटक्या विमुक्त समाजाच्या वस्तीत ढगफुटी पावसाने मोठी हानी केली असली तरी शहाजी बापू पाटील आणि शिवसेनेच्या पुढाकारामुळे बाधितांना दिलासा मिळाला. या मदत कार्याने केवळ तातडीचा आधारच नाही, तर समाजकारणाची खरी ओळखही लोकांसमोर आणली आहे असे यावेळी दादासाहेब लवटे म्हणाले
शहाजी बापू पाटील यांची कार्यशैली शहाजी बापू पाटील हे सांगोला तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे लोकनेते म्हणून ओळखले जातात. आमदारपदाच्या काळात त्यांनी अनेक विकासकामे केली असून, आजही लोकांच्या अडचणीत धावून जाण्याची त्यांची तयारी कायम आहे. अलीकडील ढगफुटीच्या घटनेतही त्यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून मदत कार्याचा वेग वाढवला. त्यांचा हा लोकाभिमुख दृष्टिकोन आणि समाजकारणाला प्राधान्य देणारी भूमिका यामुळे त्यांना सामान्य नागरिकांमध्ये विशेष आदर आहे.
या भव्य मदत कार्यात प्रशांत तेली, सुनील पाटील, वैभव गायकवाड, दादा काशीद, सौदागर केदार, संजय गायकवाड, बबन गायकवाड, ऋषिकेश गवळी, पांडुरंग काशीद, महेश लेंडवे,राजु गायकवाड संतोष जाधव, सुनील महाकाल, बंडू माने, राजू हजारे यांसारख्या मान्यवरांसह आजी-माजी सरपंच व विविध सोसायट्यांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कडलास गावचे विजय बाबर यांनी मानले.