सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल सांगोला मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरूवातीला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस प्राचार्य प्रा.केशव माने यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूल चे पर्यवेक्षक दशरथ जाधव,संस्था संचालक प्रा.डॅा.अशोकराव शिंदे ,प्रा.दिपकराव खटकाळे,सौ.वैशाली बेहेरे,प्रा.इंदिरा येडगे व चैतन्य फुले उपस्थित होते.
यावेळी आपल्या मनोगतात बोलताना संस्थासंचालक प्रा.डॅा.अशोकराव शिंदे यांनी सांगितले की,बहुजन समाज सुशिक्षित झाल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही.त्यांच्या मागासलेपणाचे एक महत्त्वाचे कारण त्यांच्यातील शिक्षणाचा अभाव होय ही गोष्ट कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ओळखून बहूजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरविले.१९१० मध्ये त्यांनी कुंभोज येथे वसतिगृहाची स्थापना केली. या वसतिगृहातून शेतकरी व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते.१९२० मध्ये भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ही संस्था महाराष्ट्रातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे स्थापन झाली.कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्राचे महान व्यक्तिमत्व होते. शिक्षण आणि समाजसुधारणेसाठी त्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली बेहेरे यांनी केले तर आभार चैतन्य फुले यांनी मानले.