जवळे(प्रशांत चव्हाण) मौजे जवळे येथील श्री.नारायण देवाच्या मंदिरात सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 पासून भगवतभक्त ह.भ.प.कै.शारदादेवी(काकी)काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या दिव्य संकल्पनेतून यांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.
मौजे जवळे येथील श्री.नारायण देवाच्या मंदिरात गेली 35 वर्ष झाली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. सकाळी 9.30 वाजता दीप प्रज्वलन करून सौ.व श्री.डॉक्टर वामनराव केशवराव थिटे यांच्या शुभहस्ते कलश पूजन करण्यात आले.
तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पूजन माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.रूपमतीदेवी साळुंखे- पाटील,सौ.रजनी सुभाष आमले यांच्या हस्ते तर विणा पूजन ह.भ.प.वसंत महाराज काटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आले.त्यानंतर व्यासपीठ चालक ह.भ.प. श्री.रामदास सुरवसे महाराज यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचनास सुरुवात केली.यावेळी गावातील महिलांनी ज्ञानेश्वरी पारायणास हजेरी लावली.
सदर प्रसंगी श्री.चंद्रकांत देशमुख गुरुजी,श्री.चंद्रकांत सुतार,श्री. दीपक चव्हाण,श्री.रमेश आप्पा साळुंखे,श्री.अनिल साळुंखे,श्री. भारत घाडगे-सरकार,श्री.अनिल सुतार,श्री.सोमनाथ स्वामी,श्री. नामदेव सुरवसे मेजर,श्री.बाळासाहेब गावडे,श्री रणजीत साळुंखे श्री.सिद्धेश्वर साळुंखे,चोपदार श्री.बाबासो सावंत,श्री.विष्णू गुरव (पुजारी)विन्याचे सेवेकरी,मृदंगमणी,गायक यांच्यासह महिला व पुरुष भाविक भक्त उपस्थित होते.