महाराष्ट्र
बँक ऑफ महाराष्ट्र चा वर्धापन दिन साजरा

बँक ऑफ महाराष्ट्र सांगोला शाखेने बँकिंग क्षेत्रात भरीव काम केले, लहान उद्योजक, शेतकरी, व्यवसाय धारक यांना कमी व्याजदरात कर्ज पुरवठा करून अनेकांचे संसार उभे करण्याचे काम केले. तसेच बँकेच्या गृह कर्ज, वाहन कर्ज, पीक कर्ज, पेन्शन योजना, विमा पॉलिसी यात पण आघाडीचे काम आहे व त्यामुळे आज 91 वा वर्धापन दिन साजरा करताना सर्वांना आनंद होत आहे अशी शाखाधिकारी नागनाथ गुंजोटी यांनी वर्धापन दिन प्रसंगी सांगोला शाखेत मत व्यक्त केले.
सुरुवातीस पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे यांच्या शुभहस्ते व शेतकरी संभाजी इंगोले, उपशाखा अधिकारी रेड्डी, कर्मचारी रवी गुरव, कांबळे, राम धनवडे इत्यादींच्या उपस्थितीत केक कापून वर्धापन दिन साजरा केला. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शेवटी रवी गुरव यांनी आभार मानले.



