महाराष्ट्र
सौ. योगिता शांत शेटे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

जि.प. प्रा. शाळा नाझरे, बलवडी ता. सांगोला येथील शिक्षिका सौ. योगिता शांत शेटे यांना त्यांच्या शैक्षणिक कामाबद्दल, शिक्षक दिनाच्या निमित्ताने सूर्योदय परिवार सांगोला तर्फे त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला येथे गौरविण्यात आले आहे.
सुरुवातीपासूनच हरहुन्नरी शिक्षिका म्हणून त्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित आहेत. जे काम आपल्यावर सोपवलेले आहेत ते काम सुंदरपणे करणे तसेच पारदर्शक करणे व त्याच्या मध्ये उच्चतम टोकाला जाऊन त्याच्यातील मर्म शोधणे व ते विद्यार्थ्यांमध्ये निर्मितीस आणणे व त्यामुळे आज पर्यंतचे त्यांचे शैक्षणिक कार्य दर्जेदार राहिल्यामुळे या अगोदरही त्यांना महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, मरवडे फेस्टिवल पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
ख्यातनाम वक्ते, कवी अविनाश भारती, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, गटविकास अधिकारी उमेश चंद्र कुलकर्णी, ब्रह्मा ग्रुपचे मारुती माळी, सूर्योदय विभागाचे प्रमुख अनिल भाऊ इंगवले, जगन्नाथ भगत, बंडोपंत लवटे, सुभाष दिघे, सौ अर्चनाताई इंगवले, सौ ज्योती भगत, सौ सुरेखा लवटे, सौ मीनाक्षी दिघे इ. च्या शुभहस्ते योगिता शेटे यांना शाल, फेटा, स्मृतीचिन्ह, ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे, सल्लागार सिद्धेश्वर झाडबुके, पत्रकार रविराज शेटे, प्रणव राज शेटे, सोसा. व्हॉइस चेअरमन गोरख भाऊ आदाटे, शिक्षक मोहन भोसले इ. उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, केंद्रप्रमुख मल्लय्या मठपती, शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी शांत यांचे अभिनंदन केले आहे.



