सांगोला तालुका

हातीद जवळा रस्त्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न

 सांगोला विधानसभा मतदारसंघातील  आमदार शहाजीबापू पाटील हे विजय झाल्यापासून कामाचाआलेख चढता चालल्याचे  दिसून येते मागील तीन वर्षापासून सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये  विविध विभागाच्या हजारो कोटी रुपये निधीचे कामे चालू  असल्याचे दिसून येते  मार्च  २०२२ अर्थसंकल्पातून ५कोटी निधी मंजूर झालेल्या  हातीद मानेगाव जवळा रस्ता  रा मा ३८९ कि मी ०/००ते ७/६०० या रस्त्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते १४जून बुधवार रोजी हतीद येथे भूमिपूजन संपन्न झाले 
 सांगोला तालुक्यातील  हा प्रमुख राज्यमार्ग असून हा हा रस्ता खराब झाल्या असल्याने  नागरिकांच्या गैरसोयीचा झाला होता यासाठी  आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सतत पाठपुरावा करून या रस्त्याचा कामासह तालुक्यातील प्रमुख रस्त्यांना  आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे  मंजूर केलेल्या निधीतील कामे दर्जेदार होण्यासाठी  आमदार शहाजी बापू पाटील यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या
 यावेळी भाऊसाहेब रुपनर, बाबुरावजी गायकवाड, डॉ पियूष साळुंखे, संभाजी आलदर  विजय शिंदे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक मुलगीर, शहाजी घाडगे, सरपंच भगत, यांच्यासह हतिद गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!