पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आयोजित दि.09 व 10 सप्टेंबर 2025 रोजी पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचा समारोप दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय, मंगळवेढा येथे उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत सांगोला महाविद्यालयातील मुलांच्या संघाने उल्लेखनीय खेळ करून व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेत विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील अनेक संघांनी सहभाग घेतला होता. विद्यापीठ संघात निवड केलेल्या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष श्री.तात्यासाहेब केदार व श्री प्रा.पी.सी. झपके, खजिनदार श्री.नागेश गुळमिरे, सचिव अॅड. उदय(बापू) घोंगडे, सहसचिव श्री. साहेबराव ढेकळे संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी महाविद्यालयातील संघाचे कौतुक केले. या संघास मार्गदर्शन करणारे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले व क्रीडा शिक्षक प्रा. जगदीश चेडे यांनी संघाचे विशेष कौतुक केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, क्रीडा समिती सदस्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही संघाचे कौतुक करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. तसेच सांगोला महाविद्यालयाच्या खेळाडूंनी दाखवलेल्या जिद्दी व संघभावनेचे उपस्थितांनी कौतुक केले.