मा.दीपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना भरीव मदत*

जवळे: -सोलापूर जिल्ह्याला यंदा पुराचा मोठा फटका बसला आहे. या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी सांगोला येथील मा.दीपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन भरीव मदत केली आहे.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब, शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब व गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पतसंस्थेच्या वतीने रु. 21000/ ( एकवीस हजार रु.)चा चेक गटशिक्षणाधिकारी यांना चेअरमन विलास डोंगरे यांचे हस्ते प्रदान केला. सामाजिक उपक्रमात ही पतसंस्था कायम अग्रेसर असून प्राथमिक शिक्षकांच्या उन्नतीसाठी अभिनव उपक्रम राबवते.
हा निधी सोलापूर जिल्ह्यातच खर्च केला जाणार असून चांगल्या कामाला हातभार लावण्यास याची मदत होईल. याप्रसंगी विस्तार अधिकारी श्री अमोल भंडारी, वाढेगाव केंद्रप्रमुख श्री.मल्लय्या मठपती,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. सुहास कुलकर्णी, जिल्हा शिक्षक सोसायटीचे संचालक श्री. गुलाबराव पाटील, ज्ञानेश्वर इंगवले, एखतपुर शाळा मुख्याध्यापक श्री.हनुमंत जाधव, बलवडी शाळा मुख्याध्यापक श्री.मनोहर पवार,संतोष ननवरे पतसंस्था सचिव श्री. अमर कुलकर्णी सह अनेक गुरुजन उपस्थित होते.



