सांगोला तालुका

कधी न नमस्कार घालणार्‍यांकडून आता घातला जातोय दररोज नमस्कार

सांगोला(प्रतिनिधी):- राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत कार्यकाळ पूर्ण होणार्‍या सांगोला तालुक्यातील बलवडी, चिणके, अनकढाळ, चिंचोली, पाचेगाव खु व शिवणे या 6 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर केला. या निवडणुकीत सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील 6 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस वाढली आहे.ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. भावी उमेदवारांकडून निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणकीमध्ये आपले नशिब अजमाविण्यासाठी तयार असणार्‍या भावी उमेदवारांनी मतदारांना नमस्कार घालण्यास प्रारंभ केला आहे. कधी न नमस्कार घालणारेे आता दररोज नमस्कार घालत असल्यामुळे ग्रामस्थांकडून चर्चेचा विषय होत आहे.

ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्‍या सांगोला तालुक्यातील बलवडी, चिणके, अनकढाळ, चिंचोली, पाचेगाव खु व शिवणे या 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच सरपंच आणि सदस्यपदासाठी कोणते उमेदवार सरस ठरू शकतात याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकारण तापले. असून निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे मतदार राजाच्या प्रत्येक कार्यक्रमात आवुर्जन सामील होऊन जाता जाता येणार्‍या निवडणुकीत लक्ष असुद्या आमच्याकडे असाही संदेश देण्यात येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भावी उमेदवारांनी सर्वप्रथम मतदार याद्या गोळा करून आपल्या वॉर्डात किती मतदार आहेत. यापैकी किती जणांचे मतदान आपल्याला मिळू शकते याचा अंदाज घेत सरपंच की सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा याची तयारी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे सांगोला तालुक्यातील बलवडी, चिणके, अनकढाळ, चिंचोली, पाचेगाव खु व शिवणे या गावांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या सभा, बैठका, भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमांना ब्रेक लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!