सांगोला तालुका

नाझरे येथे वीरभद्र जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

नाझरे (प्रतिनिधी):-नाझरे ता सांगोला येथे वीरभद्र जयंती निमित्त  शुक्रवार दि.18 नोव्हेंबर ते गुरुवार दि.24 नोव्हेंबर अखेर परमरहस्य ग्रंथाचे पारायण व ष ब्र 108 श्री गुरु महादया रविशंकर शिवाचार्य महाराज राय पाटणकर यांचे प्रवचन यासह इतर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि 18 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर अखेर दररोज पहाटे 5 ते 6 श्री रुद्राभिषेक सकाळी 9 वाजता पंचाचार्य ध्वजारोहण व सकाळी 9.30 ते 11.30 वाजेपर्यंत परम रहस्य ग्रंथाची पारायण तसेच दुपारी 4 ते 5 यावेळेत वीरशैव व रंगनाथ भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सायं. 6 ते 7 शिवपाठ व सायंकाळी 7.30 ते 8.30 महादय्या श्री. रविशंकर शिवाचार्य महाराज यांचे प्रवचन व महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे बुधवार दि.23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 ते 7.30 वाजेपर्यंत गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महाराज यांचे प्रवचन होईल
गुरुवार 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 ते 6:45 पर्यंत श्री गुरु महादय्या रविशंकर यांचे आर्शिवचन 6 वाजून 52 मिनिटांनी श्री ची फुले पडतील. त्यानंतर महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात येणार असून श्रींची मिरवणूक नाझरे गावातून महास्वामींच्या समवेत निघणार आहे. तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त वीरशैव समाज नाझरे, वझरे, कारंडेवाडी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!