कै.प्रणव उर्फ आकाश घोंगडे यांच्या स्मृती दिनानिमित्त सांगोला विद्यामंदिर मध्ये गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप.

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कै. प्रणव उर्फ आकाश उदय घोंगडे यांच्या 12व्या स्मृती दिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर संस्था खजिनदार शं.बा. सावंत, आनंद घोंगडे , प्रदीप चोथे ,उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांनी केले.यावेळी उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे ,पर्यवेक्षक अजय बारबोले ,पोपट केदार तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख राजेंद्र ढोले यांनी काम पाहिले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशितोष नष्टे यांनी केले .