उत्कर्षाच्या प्रांगणात बालदिन उत्साहात साजरा

उत्कर्ष प्राथमिक विद्यालयात बालदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अनेक उपक्रमात भाग घेऊन आपली कला सादर केली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना दप्तरावीना शाळा अनुभवता आली. पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणून बालदिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका मा. सौ. स्वरालीताई कुलकर्णी माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक मा. श्री. मिसाळ सर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सुनीताताई कुलकर्णी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावली. या कार्यक्रमावेळी इयत्ता तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी माहिती आपल्या मनोगतातून सांगितली. त्यानंतर प्रशालेच्या सहशिक्षिका सौ. दिघे बाई यांनी मुलांना चाचा नेहरू यांची गोष्ट सांगितली.
यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उपक्रम व खेळ राबविले ते पुढील प्रमाणे-: वर्ग सजावट, कागद काम, चित्रपट दाखवणे (लेट्स चेंज चित्रपट) बाग काम करणे तसेच बादलीत चेंडू टाकणे, गाढवाला शेपूट काढणे, फुगे फोडणे, संगीत खुर्ची यासारखे मनोरंजनात्मक खेळ खेळण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून भेळ करण्यात आली व सामूहिक नृत्याने दिवसभरातील कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यालयाच्या सहशिक्षिका रसाळ बाई यांनी मानले व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.