सांगोला तालुका

संभाजी ब्रिगेड सोलापूर ( पंढरपूर विभाग ) जिल्हाध्यक्ष पदी प्रदिप मिसाळ पाटील यांची निवड

 

संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा ( पंढरपूर विभाग ) पुनर्गठन – पुनर्बांधणी बैठक काल गाडगे महाराज धर्मशाळा , पंढरपूर येथे उत्साहात पार पडली .यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष ,पंढरपूर शहराध्यक्ष पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या व सर्वानुमते
” प्रदिप मिसाळ पाटील ” यांची सोलापूर ( पंढरपूर विभाग ) जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली . सदर बैठकीस , सांगोला , माळशिरस , करमाळा , पंढरपूर , माढा तालुक्यातून शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रविणदादा गायकवाड यांनी दिलेला “नवी दिशा नवा विचार” गाव खेड्यात पोहचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला .

कार्यक्रम पार पडल्यावर पंढरपूर शहरात पदयात्रा काढून महापुरुषांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवाद करण्यात आले , या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य संघटक प्रदिप कणसे , पुणे विभाग अध्यक्ष दिपकदादा वाडदेकर , पुणे विभाग उपाध्यक्ष राजू मगर , सोलापूर विभाग जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले ,जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दिघे सोलापूर शहराध्यक्ष श्याम कदम , करमाळा तालुकाध्यक्ष सुहास पोळ , सांगोला शहराध्यक्ष राजू शिंदे , पंढरपूर तालुकाध्यक्ष रामदास घाडगे ,पंढरपूर शहर उपाध्यक्ष शनी घुले ,मल्हार गायकवाड ,ओमराज मोहिते , कौस्तुभ शिंदे , सोमनाथ गायकवाड , इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!