सांगोला तालुकामहाराष्ट्र

सुधारित सांगोला सिंचन प्रकल्पास स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

शिंदे- फडणवीस सरकारने दिली तत्काळ मंजुरी..... शहाजीबापू पाटील यांची माहिती

 

HTML img Tag Simply Easy Learning    

 

अतिरिक्त 12 गावांचा आणि 8875 क्षेत्रांचा नव्याने समावेश

सांगोला (प्रतिनिधी)- अतिरिक्त 12 गावांचा समावेश करून आणि 8,875 हे. क्षेत्राचा नव्याने समावेश करून तयार करण्यात आलेल्या सुधारित सांगोला उपसा सिंचन योजना प्रकल्पास स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या माझ्या दोन वर्षे प्रलंबित मागणीस नवीन शिंदे फडणवीस सरकारने काल तत्काळ मंजुरी दिली असल्याची माहिती सांगोला विधानसभेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

मूळ सांगोला उपसा सिंचन प्रकल्पामध्ये सांगोला तालुक्यातील अनेक गावे वगळण्यात आली होती आणि सदर योजनेवर मंजुरी नंतर गेल्या पंधरा-वीस वर्षात 5% पेक्षा कमी खर्च झाल्याने आणि राजकीय प्रशासकीय दुर्लक्षामुळे सदर योजना जवळजवळ मृत झाली होती. सदर योजनेस नव्याने सर्वेक्षण करण्याचा आग्रह आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रशासनाकडे धरला होता. त्यानुसार सर्वेक्षण होऊन परिगणके घेऊन ही सुधारित योजना तयार करण्यात आली आहे. सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या या सुधारित योजनेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा आग्रह आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे सरकारकडे केला होता. खुद्द उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये शहाजीबापू पाटील यांनी हा मुद्दा लावून धरला होता. तथापि त्यावेळी जलसंपदा विभागाने या मागणीची कसलीही दखल घेतली नाही. तथापि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ ही मागणी आज मंजूर केली आहे.

“आमची अनेक गावे पाण्यापासून वंचित होती. गेली दहा-पंधरा वर्षे आंदोलन करून ही आमची दखल कोणीही घेतली नाही. शहाजी बापूंनी सुधारित योजनेमध्ये आमच्या गावांचा समावेश केल्याने आमच्या पिढ्यानपिढ्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.”….दादासाहेब लवटे(लोटेवाडी)

 

” सांगोला तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या सुधारित सांगोला उपसा सिंचन प्रकल्पास स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्याचा अभिमान व आनंद आम्हाला वाटत आहे.जे काम मुलाने केले नाही ते काम एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ केले. याची दखल सर्व बाळासाहेब ठाकरे प्रेमी घेतल्याशिवाय राहणार नाहीत.”

……गोविंद जरे

माजी जि प सदस्य महूद बु

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!