सांगोला तालुका

भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये क्रांतीसिंह नाना पाटील,येडे मच्छिंद्र(ता-वाळवा)संघ विजयी

सांगोला पंचायत समितीचे पहिले सभापती,सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,लोटेवाडी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेचे उदघाटन डि.व्ही.पी.उद्योग समूहाचे मॅनेंजिंग डायरेक्टर मा.श्री.अमर पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्मृती समारोह समितीचे अध्यक्ष श्री.बाबुराव गायकवाड,उपाध्यक्ष श्री.अरुणभाऊ शेंडे,सांगोला तालुका कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी,प्रशालेचे प्राचार्य,पर्यवेक्षक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,ग्रामस्थ उपस्थित होते.
या स्पर्धेत पुणे,सांगली,सोलापूर,सातारा,कोल्हापूर या विविध जिल्ह्यातील संघांनी सहभाग नोंदवला.या स्पर्धेतील अंतिम सामना क्रांतीसिंह नाना पाटील येडेमछिंद्र(ता-वाळवा)व प्रकाश तात्या,पुणे या दोन संघामध्ये झाला.या चुरशीच्या अंतिम लढतीत क्रांतीसिंह नाना पाटील येडेमछिंद्र संघाने विजय मिळवला.या संघाला पारितोषिकामध्ये रोख रुपये ३१,००१/-आणि चषक देण्यात आले.तर उपविजेत्या प्रकाश तात्या,पुणे संघाला २५,००१/-आणि चषक,तृतीय क्रमांकासाठी साई स्पोर्ट्स क्लब कडलास(अ) संघाला २०,००१/-आणि चषक,चतुर्थ क्रमांकासाठी स्वराज्य,सांगोला संघाला १५,००१/-आणि चषक प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसामध्ये उत्कृष्ट मालिकावीर-आबासो गायकवाड(कडलास-अ),उत्कृष्ट चढाई-संकल्प करवते(तरुण भारत,सांगली),उत्कृष्ट पकड-प्रदीप भगत(प्रकाश तात्या,पुणे)या संघातील खेळाडूंना देण्यात आले.स्पर्धा यशस्वीरित्या शांततेत पार पाडण्यासाठी सांगोला तालुका कबड्डी असोसिएशनचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!