सांगोला तालुकाशैक्षणिक

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमधील पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये ३० विद्यार्थ्यांची निवड

सांगोला: येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ‘झायडस कॅडीला अँड वेलनेस
फॉरएव्हर गोवा  या कंपनीच्या वतीने  पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन ओपेक्स
इंडिया मार्फत  दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी  करण्यात आले होते.
यामध्ये एकूण ११० हुन अधिक  विद्यार्थ्यांनी  आपला सहभाग नोंदविला
असल्याची माहिती  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी सांगितले.

या  पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये ‘झायडस कॅडिला अँड वेलनेस फॉरएव्हर
गोवा  कंपनीचे  टेक्निकल ट्रेनर प्रदूमज्ञ  मगदूम  व  चिप कन्टेन्ट ऑफिसर
ओपेक्स इंडियाचे जोएल बार्देस्कर  यांनी विद्यार्थ्यांची टेक्निकल टेस्ट,
तांत्रिक कौशल्य व मुलाखत या प्रक्रियेद्वारे  निवड करण्यात आली.  डी व
बी फार्मसीच्या  शेवटच्या वर्षांमध्ये शिकत असलेले विद्यार्थी यामध्ये
सहभागी झाले होते. यामध्ये  फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे २२ विद्यार्थी
तसेच स्वेरी कॉलेजचे ४,सह्याद्री कॉलेजचे २, व नूतन कॉलेजचे २ असे एकूण
३० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

या निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे  संस्थेचे चेअरमन  श्री.
भाऊसाहेब रूपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर,  कार्यकारी संचालक
श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे,  प्राचार्य डॉ.
संजय बैस यांनी अभिनंदन केले. हा कॅम्पस ड्राईव्ह यशस्वी पार पाडण्यासाठी
ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ सविता सोनवणे तसेच डी फार्मसीचे
प्रा.सुरज मणेरी, प्रा  सुरज  कांबळे, प्रा रोहित पवार, डिग्रीचे   डॉ.
योगेश राऊत, डॉ. जिवन लवांडे, प्रा.एस एम काझी,प्रा श्रीनिवास माने,प्रा
शिरीष नागनसूरकर प्रा. रिचाश्री फराटे, प्रा. स्मिता स्वामी यांचे
सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!