लोणारी समाज सेवा संघाच्या सांगोला अध्यक्षपदी संतोष करांडे तर सचिवपदी दत्तात्रय नरळे

कोळा/ प्रतिनिधी: लोणारी समाज सेवा संघ या संघटनेच्या नूतन सांगोला तालुका कार्यकारणीची निवड नुकतीच समस्त लोणारी समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आली. यावेळी लोणारी समाज सेवा संघाच्या कार्यकारणीची बैठक सांगोला येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी सांगोला तालुका नूतन कार्यकारणी जाहीर केली असून लोणारी समाज सेवा संघाच्या अध्यक्षपदी कोळे गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष करांडे यांची तर सचिवपदी दत्तात्रय नरळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सांगोला तालुक्यातील मोठ्या संख्यने लोणारी समाज बांधव उपस्थित होते.

या बैठकीच्या माध्यमातून सांगोला तालुका कार्यकारणी निवडण्यात आली त्यामध्ये लोणारी समाज सेवा संघाच्या कार्याध्यक्षपदी जुजारपुरचे दिलीप हिप्परकर, खजिनदारपदी बुद्धेहाळचे गोरख निमग्रे, उपाध्यक्षपदी हणमंत शिंदे (वाटंबरे), सुरेश गवंड (आगलावेवाडी),राजू सांगोलकर(बलवडी), संजय गोडसे(सोमेवाडी) दादासाहेब घेरडे (किडेबिसरी) किरण नरळे( खिलारवाडी) पुण्यवंत निमग्रे( वाकी घे.) सोमनाथ बाड( नरळेवाडी), अजित करचे( पाचेगाव बु), मल्हारी घेरडे ( वाकी घे.), तालुका संघटक पदी सोमनाथ नरळे ( लक्ष्मी नगर), वैष्णव हेटकळे (महूद),विशाल गळवे(गळवेवाडी), बाबासाहेब खांडेकर( इटकी), काशिलिंग खिलारे ( खिलारवाडी), रावसाहेब कुटे(राजुरी), नाथा घेरडे (किडेबिसरी), विशाल नरळे (तिप्पेहाळी) माणिक करांडे (डिकसळ), आकाश करांडे ( करांडेवाडी), अंकुश डुकरे(सोमेवाडी) प्रसिद्धी प्रमुख व तालुका प्रवक्ते पदी अनिल नवत्रे( जवळा) सहसचिव पदी सोमनाथ गोडसे( लक्ष्मीनगर) दत्तात्रय करांडे( डिकसळ) बाबासाहेब गोडसे( चिकमहूद) सांगोला तालुका संपर्क प्रमुखपदी बाळासाहेब घेरडे( किडेबिसरी), सहसंपर्क प्रमुखपदी आबा करांडे(कोळा), कायदेशीर सल्लागार पदी अॅड. नवनाथ खट्टे, कार्यकारणी सदस्यपदी दत्ता आटपाडकर(डिकसळ), बजीरंग हिप्परकर, विष्णू हिप्परकर( जुजारपूर), राहुल करांडे, दादासाहेब करांडे(डिकसळ), सल्लागार पदी अजित नरळे( खिलारवाडी), नानासाहेब वाळखिंडे( वाकी. शि.) शरद हिप्परकर( खिलारवाडी) गजेंद्र हिप्परकर( जुजारपूर) प्रकाश करांडे( कोळा) तर सोशल मिडिया प्रमुख पदी विकास गेंड(घेरडी) सतीश नरळे, लक्ष्मण करांडे (जवळा)यांचा समावेश असून सर्व समाज बांधवांच्या वतीने नुतून पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.

संघटनेच्या सर्व नूतन पदाधिकारी यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असून समाजाचे सामाजिक,आर्थिक पातळीवरील विविध प्रश्न संघटनेच्या वतीने हाताळण्यात येतील. लोणारी समाज हा सांगोला तालुक्यात लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक तीनचा समाज असून हा समाज कायम वंचित राहिला आहे. या समाजाचे प्रश्न व्यापक पातळीवर घेऊन जाणार असून गाव पातळीवर लोणारी समाज संघटनेच्या शाखा उभ्या करणे, कार्यरत नसणाऱ्या शाखा पुनर्जीवित करणे तसेच तसेच समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे स्मारक सांगोला शहरात उभे करणे, तसेच महाराष्ट्र पातळीवर समाजासाठी काम करणाऱ्या संघटनांना एकत्र करून समाजाचा राजकीय दबावगट तयार करण्यासाठी सर्वांच्या एकजुटीने राजकारण विरहीत काम करणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

या बैठकीत सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष बाबासाहेब करांडे, लोकनेते शिवाजीबापू घेरडे, उद्योगपती इंजि..अशोक नरळे, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष दीपक गोडसे, दत्ता नरळे, सिद्धेश्वर हिप्परकर गुरुजी, प्रा. अनिल नवत्रे आदींनी मनोगते व्यक्त करून सर्व नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. या बैठकीचे सुत्रसंचालन व प्रास्तविक वैष्णव हेटकळे यांनी तर आभार लखनराज खांडेकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button