विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत विज्ञान महाविद्यालयाचे वर्चस्व

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर महाविद्यालयीन मुला मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धा दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी के बी पी कॉलेज पंढरपूर येथे संपन्न झाल्या.
या बॉक्सिंग स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातले महाविद्यालय असून ही विज्ञान महाविद्यालय सांगोला यांनी आपले वर्चस्व कायम राखले 2004 साली विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हापासून आज पर्यंत दर वर्षी होणाऱ्या बॉक्सिंग स्पर्धेत कमीत कमी दहा ते पंधरा गोल्ड सिल्वर ब्रँच पदक मिळवीत विज्ञान महाविद्यालयाने आपला दबदबा कायम राखला
54 ते 57 किलो वजनी गटात देवकते स्नेहल तानाजी हिने प्रथम क्रमांक मिळवला कुमारी अनुराधा सुरेश शेळके हिने 81 किलो वरील गटात निर्विवाद पणे प्रथम क्रमांक मिळवला तसेच शेंडे प्रियांका ईश्वर हिने 50 ते 52 किलो वजनी गटात दुसरा क्रमांक मिळवला तर पुरुष गटात वाघमोडे लक्ष्मण बाळासाहेब यांनी 56 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला तर शिंदे रेवन मोहन याने 91 किलो वरील गटात प्रथम क्रमांक मिळवला तसेच पाटोळे साहिल तानाजी याने 80 ते 86 किलो वजनी गटात दुसरा क्रमांक मिळवला व बिचुकले अनिकेत विलास व खंडागळे वैभव बाळासो याने अनुक्रमे तिसरा क्रमांक मिळवला
वरील सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.विजय पवार यांचे मार्गदर्शन व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर. ए. फुले यांचे सहकार्य लाभले या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे संचालक प्रा. डॉ. अशोकराव शिंदे सर व प्रा. दीपक खटकाळे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला