क्रीडा

राजमाता क्रिकेट ॲकॅडमी सांगोला येथील कु. विभावरी देवकते हिची जिल्हा महिला क्रिकेट संघात मध्ये निवड

राजमाता क्रिकेट ॲकॅडमी सांगोला येथील कु-विभावरी उदय देवकते हिची 15 वर्षाखालील सोलापूर जिल्हा महिला क्रिकेट संघात मध्ये निवड झाली असून 21 नोव्हेंबर पासून पुणे येथे सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी ती रवाना झाली आहे.
तिच्या या निवडीबद्दल तिला पुढील वाटचालीसाठी राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. नगरसेवक आनंदा माने, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन निवड समितीचे सदस्य उदय डोके सर व डॉ. अमर शेंडे सर यांनी शुभेछा दिल्या. तसेच तिला राजमाता क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक प्रशांत काशीद सर, रणजित गवळी सर, अक्षय जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!