नंदेश्वर येथील पांडुरंग मोटे यांची राज्यकर निरीक्षकपदी निवड

नंदेश्वर (प्रतिनिधी)-नंदेश्वर तालुका मंगळवेढा येथील पांडुरंग श्रीरंग मोटे यांनी सन २०२० व २०२१ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये घवघवीत दुहेरी यश संपादन केलेले असुन त्यांची राज्य कर निरीक्षक पदी निवड झालेली आहे.त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा नंदेश्वर, माध्यमिक शिक्षण श्री बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर, उच्च माध्यमिक शिक्षण विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला व पदवीचे शिक्षण राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे पूर्ण झालेले असून या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज,देवसागर साधक ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर लाड,श्री बाळकृष्ण विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य भारत बंडगर, मेजर सोपान मेटकरी,सहशिक्षक नागेश दुधाळ,अशोक मासाळ, अंकुश हाके,दामाजी सलगर यांच्यासह नंदेश्वर ग्रामस्थांनी अभिनंदन केलेले आहे.