सांगोला पोलिसांकडून चंदनाची लाकडे जप्त; तिघांवर गुन्हा दाखल
सांगोला (प्रतिनिधी) रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना दुचाकीवरून अवैध रित्या चंदन लाकडे घेवून जात असताना एकास ताब्यात घेवून १० हजार रु.किमतीचे चंदन लाकडे व ४० हजार रुची दुचाकी जप्त करून तीन जनावर गुन्हा दाखल केल्याची घटना गुरुवार दिनांक २४ नोहेंबर रोजी सांगोला शहरातील सांगोला ते पंढरपुर रोड बायपास ब्रिज जवळ घडली आहे.

मा.पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांचे आदेशान्वये गुरुवार दि.२४ रोजी पहाटे अडीच च्या.सुमारास धनंजय अवताडे, सपोनि राजुलवार , पोहेकॉ क्षिरसागर , ,काझी , झोळ पोना तुकाराम व्हरे , घुले , कुंभार असे सांगोला शहरात रात्री गस्त करीत असताना सांगोला ते पंढरपुर रोडने पेट्रोलिंग करीत असताना सांगोला बायपास ब्रिज जवळ रोडवर मंगळवेढा रोडने दुचाकीवरील तीन इसम बसुन मध्यभागी पांढऱ्या पोत्यात लाकडे घेवुन जोराने येताना दिसले. दुचाकीचा संशय आल्याने पोलिसांनी बॅटरीच्या उजेडाने व हाताचे इशारा करून थांबणेचा इशारा केला असता सदर मोटारसायकल ही पोलिसापासुन थोड्या अंतरावर थांबली असता दुचाकीवरील पाठीमागे बसलेले दोन इसम उतरुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. पोलिसांनी दुचाकी स्वारास हटकले असता पोत्यात चंदन लाकडे असल्याचे दिसून आले पोलिसांनी घटनास्थळावरून १० हजार रु.किमतीचे ओले चंदन व ४० हजार रु.किमतीची दुचाकी जप्त केली आहे याबाबत पो. कॉ धनंजय अवताडे यांनी दिलेल्या फिर्यादनुसार तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.