सांगोला लायन्स क्लबकडून प्रसिद्ध वक्ते अविनाश हळबे यांचे व्याख्यान

भारतीय संविधान दिन व शहीदांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजन
सांगोला (प्रतिनिधी) भारतीय संविधान दिन व २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतिप्रित्यर्थ लायन्स क्लब ऑफ सांगोला कडून प्रसिद्ध वक्ते व साहित्यिक मा. अविनाश हळवे, पुणे यांचे ‘भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे’ या विषयावरील व्याख्यान प्रांत ३२३४ ड १ माजी प्रांतपाल मार्गदर्शक मा.ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली व सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक बिभिषण माने,अजय बारबोले,पोपट केदार यांचे उपस्थितत सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७.४५ वा होणार आहे.
सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता नववी ते बारावीच्या विचार आणि कृती करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनात देशाभिमान वर्धिष्णू होण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे’ या विषयावरील व्याख्यानामध्ये १९४७ च्या सुमारास स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळी असलेली सर्वस्वी प्रतिकूल परिस्थिती आणि आज २०२२ पर्यंत आपल्या देशाने केलेली विस्मयकारक प्रगती, याविषयी सकारात्मक आणि अभिमानास्पद माहिती मी अतिशय रंजक पद्धतीने दिली जाणार आहे.यामध्ये देशाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक धोरणातील महत्वाचे टप्पे, आरोग्य, पर्यावरण, संरक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान, अणुशक्ती विकास, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी घेतला जाणार आहे. तरी या वैचारिक मेजवानीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सांगोला लायन्स क्लबच्या वतीने अध्यक्ष प्रा.धनाजी चव्हाण, सचिव ला.उन्मेश आटपाडीकर, खजिनदार ला.प्रा.नवनाथ बंडगर यांनी केले आहे.