सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

सांगोल्यातील १६ विकास कामांसाठी एक कोटींचा निधी मंजूर – चेतनसिंह केदार सावंत

सांगोला ( प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील विविध गावातील रस्ते सुधारणा, सभा मंडप बांधणे, पेव्हींग ब्लॉक करणे अशा १६ विकासकामांसाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा सांगोला विधानसभा निवडणुक प्रमुख चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. सदरची कामे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली असून सदरची कामे दर्जेदार व दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

याबाबत पत्रकारांशी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा सांगोला विधानसभा निवडणुक प्रमुख चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, सांगोला तालुक्यातील विविध गावातील विकास कामांना निधी उपलब्ध करून मिळावा अशी मागणी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे केली होती. विकासकामांच्या अनुषंगाने वारंवार पाठपुरावा केला होता. वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे १६ विकास कामांना मंजुरी मिळाली असून सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
वासूद येथील मरीआई मंदिर ते सातकी वस्ती रस्ता सुधारणा करणे २० लाख रुपये, कडलास येथील श्रीराम मंदिराच्या समोर सभा मंडप करणे ५ लाख,
वाटबरे येथील खंडोबा मंदिर दक्षिणद्वार परिसर ब्लॉक बसविणे ७ लाख, जुजारपूर येथील कारंडेवाडी फाटा गणपती मंदिर ते बाबासो हिप्परकर वस्ती पर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, हलदहिवडी येथील युवराज लेंडवे वस्ती ते गहिनीनाथ पारसे वस्ती ते किसन फाळके वस्ती रस्ता करणे ७ लाख, पाचेगाव खुर्द येथील नलवडेवाडी ते जुना डोंगरगांव रस्ता सुधारणा करणे ५ लाख, हातीद येथील गावठाण बंधारा ते माळी परीट बस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, चिनके ते अजनाळे रस्ता सुधारणा करणे ५ लाख, घेरडी येथील बाजार कट्टा पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लाख,
कारंडेवाडी (उदनवाडी) येथील चौगुले वरती ते धारेश्वर गो शाळा पर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख,
वझरे येथील संपत्ती कोकरे वस्ती ते ईराप्पा वाकडे घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, लोटेवाडी येथील नरके वस्ती ते म्हसोबा देवस्थान रस्ता सुधारणा करणे ५ लाख, अजनाळे येथील अभिनव पलिक स्कूल ते खंडोबा मंदिर रस्ता सुधारण करणे ५ लाख,
पाचेगाव बु. येथील अजित कर्चे वस्ती से किडबिसरी शिव रस्ता सुधारणा करणे ५ लाख, किडबिसरी येथील बाबासाहेब घेरडे ते भगवान घेरडे वस्ती रस्ता सुधारणा करणे ६ लाख, य. मंगेवाडी येथील गोरख काटे वस्ती ते संजय येलपले वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख अशा १६ कामांसाठी एक कोटी रुपयांछा निधी मंजूर झाला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा सांगोला विधानसभा निवडणुक प्रमुख चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!