राजकीयसांगोला तालुका

गडचिरोली येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी उठवला आवाज

ओला दुष्काळ जाहीर करुन.. अवकाळीने नुकसान झालेल्यां शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याची मागणी डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांनी भाई जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथे सुरु असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समीतीच्या बैठकीत केली.

HTML img Tag Simply Easy Learning    

राज्यामध्ये जुन 2022 ते आॕगस्ट 2022 अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.32 जिल्हात य26 लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे.तसेच पाऊसाचा कहर झाला व चार जिल्ह्यांतील पिके पाण्याखाली गेली पाऊस चालु आसताना‌ गोगलगाईने कहर‌ केला त्यामुळे चार जिल्ह्यांतील 73हजार‌ हेक्टर ‌वरील‌‌ सोयाबीन नष्ट झाले तसेच सततच्या संतधार‌ पाऊसामुळे 9 जिल्हातील साडेपाच लाख‌‌ हेक्टर जमीनीवरील पिके नाहीसी‌ झाली आहेत..आॕक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात मोसमी पाऊसाने जाता जाता पुंन्हा तडाखा दिला व त्याचा फटका दिड लाख हेक्टर वरील हाताला आलेल्या पिकांचे नुकसान झाले . थोड्याशा विश्रांती नंतर पुन्हा पाऊसाचा कहर‌‌ सुरु झाला व त्यामध्ये 16 जिल्ह्यातील‌ दिड लाख हेक्टरवरील पिके नाहीसी‌ झाली..

 

 

महाराष्ट्राचे‌ एकुण भौगोलिक क्षेत्रफळ 307.58 लाख हेक्टर असुन त्यामध्ये पेरणी योग्य क्षेत्रफळ हे 166.50 लाख हेक्टर आहे.त्यापैकी खरीप पिकासाठी क्षेत्र 151.33 लाख हेक्टर असुन, रब्बीचे क्षेत्र 51.20 लाख हेक्टर आहे..म्हणजे एकुण खरीपाच्या 30 टक्क्यांहुन अधिक क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे.
आशा लहरी पाऊसामुळे जि पिके हातात आली त्या पिकांनाही बाजारभाव मिळाला‌ नाही.सोयाबीन सारख्या पिकांना तर शेंगांना कोंब‌ फुटले..व सोयाबीन काळे पडले‌ गेले.तसेच मराठवाड्यात व‌ विदर्भातील वेचणीला आलेला कापुस पाऊसात भिजले.कापुस पाण्यावर ‌तरंगत होता त्यामुळे कापसाला मिळणारा दर पंन्नास टक्के कमी मिळाला यवतमाळ,अकोला ,वाशीम,नांदेड परभणी ,बिड,हिंगोली या जिल्ह्यांत पाऊसाने‌ फार‌ फोठे नुकसान झाले आहे.तसेच अतिवृष्टीचा फटका जळगाव‌ भागालाही बसला‌ या भागातील केळीच्या ‌बागामध्ये साचलेल्या पाण्यामुळे झाडांची मुळे कुजली पाने पिवळी पडली. उष्णता नसलेमुळे केळी पक्व होण्याचा कालावधी वाढला परीणामी केळीचा दर्जा घसरला व केळीचे भाव गडगडले.तीच अवस्था टोमॅटो व‌ भाजीपाला‌‌ याची‌ झाली..तसेच पश्चिम महाराष्ट्रातील व मराठवाड्यात ऊसाच्या पिकांमध्ये पाणि साचलेमुळे , रस्ते नांदुरस्त झाले आहेत,ऊसतोड करता येत नाही परीणामी कारखाने दसऱ्याला‌ सुरु होणारे‌ साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालु राहीलेले‌ नाहीत.कारखान्याचे‌ गाळप लांबल्याने ते गाळप एप्रिल मे पर्यंत चालणार‌ आहे.त्याचा फटका‌ ‌ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.नाशीक, जळगाव, पुणे,नगर‌,सांगली, सोलापूर आशा भागातील द्राक्ष बागांच्या छाटणी 15 ऑगस्ट सुरु होतात परंतु या वर्षी दिवाळी झाली तरीही २० टक्के ‌छाटणी झाली नाही. द्राक्ष हे नाजुक पिक आसलेमुळे त्यावरती फवारणी करण्याची औषधे सुध्दा महाग आहेत त्यामुळे शेतकरी अधिकची जोखीम घ्यायला तयार नसल्यामुळे नवीन द्राक्ष लागवडीचा तर‌ विषयच उरला‌ नाही.
आशा‌ नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी अधिकारी वर्ग उदासीन आहेत.त्यांच्या मध्ये उदासिनता पहावयास मिळत आहे..पंचनामे कोणी करायचे,केले‌ तर‌ पुढे काय? ‌‌जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी आशा कामावरती बहिष्कार टाकल्याच्या ‌बातमया प्रसारमाध्यमे वाचायला व‌ पहावयास मिळतात.
पिक विम्याच्या बाबत‌‌ तीच अवस्था आहे.अतिवृष्टित‌ नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचावन्न लाख अर्ज आले आहेत.आशा‌ अर्जांची खातर‌ जमा करुन लाभ‌ मिळेल‌ आसे सांगीतले जाते.केंद्र व‌ राज्य ‌सरकार या दोघांची व पिक‌ विमा कंपनीची‌‌ एवढी दिरंगाई आहे की..पिक विम्याच्या आणखी लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही..काही मंडळांमध्ये तर गरज आसताना‌ तेथील शेतकऱ्यांना पिक विम्यापासुन वंचीत रहावे लागत आहे.ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळतो तो शेती उत्पादनाच्या दहा टक्के सुध्दा मिळत नाही त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
जागतीक तापमान वाढीमुळे आता उष्णतेच्या लाटा, चक्री वादळ, गारपीट, अतिवृष्टी , अवकाळी पाऊस,पिकांवरील विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना‌ दिसत आहे..फळ बगावरती फळांना प्लास्टिक आच्छादन करणे खर्चीक आहे..काही पिके काढल्यावरती ती पाऊसात भिजतात.शेतकऱ्यांना त्याची सोय नाही.कितीतरी घटना आशा आहेत हातात आलेली पिके पाऊसामुळे, उष्णतेमुळे नाहीशी झाली आहेत.यासाठी सरकारने पुढाकार घेऊन शितगृहाची साखळी ग्रामीण भागात उभी केली पाहिजे.सध्याची शेती आधुनीक‌ तंत्रज्ञानाचा वापर करून केली पाहीजे.व त्यासाठी केंद्र व‌ राज्य सरकारने योग्य ते सहकार्य केले पाहिजे.
शेतीसुध्दा आता भांडवल गुंतवणूक करण्याचा व्यवसाय झाला आहे शेती व्यवसायात शेतकरी भांडवल गुंतवणूक करण्याच्या मनस्थितीत नाही कारण उत्पादन खर्चाच्या प्रमाणात शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही.. त्यात निसर्गाची अवकृपा.त्यामुळे शेती विकुन‌ टाकावी असा टोकाचा विचार‌ शेतकऱ्यांच्या मनामध्ये येणे सहाजीक आहे परंतु 130 कोटी लोकसंख्येच्या भारत देशाला शेती सोडुन देणे हे परवडणारे नाही..आपला देश शेतीप्रधान देश आहे.आपली अर्थ व्यवस्था शेतीवरती अवलंबून आहे.यासाठी सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी योग्य ती मदत केली पाहिजे व शेती व्यवसायासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले‌ पाहिजे शेती मालाला योग्य हमी भाव मिळवुन दिला पाहिजे.तसेच पिक विम्यातुन खाजगी कंपन्या हद्दपार केल्या‌ पाहीजेत.आशा उपाय योजना‌ केंद्र व‌ राज्य सरकारने करणे गरजेचे आहे.

 

डॉ भाई बाबासाहेब‌‌ देशमुख यांनी खालील‌ पुढील मागण्या सरकारकडे केल्या ‌आहेत त्यामध्ये १) राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा २)‌अतिवृषटी मुळे झालेल्या शेतकर्याना शंभर टक्के मदत द्यावी ३)प्रती एकर पन्नास हजार रुपयांची मदत ताबडतोब द्यावी ४)पहाणी अहवालाची अट अपवाद म्हणून रद्द करावी ५ )सोयाबिनला प्रती क्विंटल ८५००/-रुपये भाव द्यावा.६)कापसाला प्रती क्विंटल १२५००/-रुपये भाव द्यावा ७)तुरीला प्रती क्विंटल ९५००/-‌रुपये भाव द्यावा ८)वरील भावाने तुर, सोयाबीन,कापुस शासनातर्फे खरेदी करावे ९)‌गाववार शेतीमाल‌ साठवणूकीसाठी गोडाऊनची व शितगृहाची शासकीय खर्चाने व्यवस्था करावी १०) अतिवृष्टीमुळे ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला -मुलींची शैक्षणिक फि शैक्षणिक साहित्य इत्यादी शासनातर्फे देण्याची‌ व्यवस्था करावी..
आशा मागण्या करीत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी गडचिरोली येथील शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समीतीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आवाज‌ उठवला..सदर कार्यक्रमास पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील,या.आ.बाळाराम पाटील,मा.आ.धैर्यशिल पाटील,आमदार श्यामसुंदर शिंदे,आशाताई शिंदे,राजु कोरडे,एस.व्ही.जाधव, बाबासाहेब करांडे तसेच सर्व जिल्हा चिटणीस व तालुका चिटणीस पुरोगामी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष उपस्थित असलेल्याची माहीती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!