कोळे ता.सांगोला येथे 5 लाख 68 हजारच्या दागिन्यांची चोरी

अज्ञात चोरट्याने बंद घराचा कडी कोंयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील साडेअठरा तोळे सोन्याचे दागिने व 25 तोळे चांदीचे दागिने असा सुमारे 5 लाख 68 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवार दि.26 नोव्हेंबर रोजी कोळे ता. सांगोला येथे घडली आहे.
वंदना शिवाजी आलदर 49 रा. बोधगिरे वस्ती, कोळे ता. सांगोला यांचे पती शिवाजी आलदर आजारी असल्याने त्यांना 10 नोहेंबर रोजी पुणे येथील ए.आय.सी.टी.हॉस्पीटल येथे उपचाराकरीता अँडमिट केले होते दरम्यान दि. 22 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वा.चे सुमारास आलदर कुटुंबीय राहत असलेल्या घराला कुलुप लावुन वंदना आलदर, मावस भाऊ दत्तात्रय दादु मदने व ड्रायव्हर अनिल महादेव कोळेकर सर्व रा.कोळा ता.सांगोला असे मावस भाऊ दत्तात्रय मदने याचे ओमनी कारने कोळा येथुन पती शिवाजी यांचेवर ऑपरेशन करावयाचे असल्याने पुणे येथे गेले होते . त्यानंतर वंदना या पुणे येथे पतीजवळच थांबल्या होत्या पती शिवाजी यांचेवर ऑपरेशन झाल्यानंतर मावसभाऊ दत्तात्रय मदने व अनिल कोळेकर असे दोघेजन गाडी घेवुन परत घराकडे निघुन आले होते शनिवार दि.26 नोहेबर रोजी पती शिवाजी यांना हॉस्पीटल मधुन डिस्चार्ज दिल्यानंतर फिर्यादी वंदना व पती शिवाजी असे पुणे येथुन कोळा बसस्टॅन्ड येथे ट्रॅव्हल्सने 26 नोहेंबर रोजी रात्री पावणेबारा वा.चे सुमारास आले व गावातील ओळखीचा साजिद अल्लाउद्दिन अत्तार रा कोळा यास फोन करुन बोलावून घेतले व त्याने कोळा बसस्टँन्ड वरून दुचाकीवरून फिर्यादी वंदना व पती शिवाजी यांना घराजवळ सोडुन तो तेथुन निघुन गेला आलदर पतीपत्नी हे घराजवळ गेल्यावर घराचे कुलुप तोडलेले व जमिनीवर पडलेले दिसून आले तसेच दरवाजा उघडा दिसला त्यामुळे आम्हाला घरामध्ये चोरी झाल्याची शंका आल्याने आलदर यांनी घरात जावुन पाहीले असता घरामध्ये असलेले लाकडी कपाट उघडलेले दिसले नंतर किचनमध्ये जावुन पाहीले असता तिथेही लाकडी लॉकर उघडा दिसला . त्यावेळी आम्हाला लॉकर मध्ये मी ठेवलेले सोन्याचे दागीने पाहीले असता ते दिसुन आले नाही . यावरुन आमची खात्री झाली की आमच्या गैरहजेरी मध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन कपाटात व लाकडी लाँकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने चोरून नेले आहेत आलदर यांनी कपाटात व लॉकर मधे ठेवलेले 2 लाख 55 हजार रु.चे एक साडेआठ तोळ्याचे वजनाचे सोन्याची चैन,तीस हजार रु.किमतीचे 1 तोळ्यांचे मंगळसुत्र ,90 हजार- रु.चे दोन 3 तोळा वजनाचे कानातील सोन्याचे झुंबके, 1 लाख 20 हजार रु.चे दोन 4 तोळा वजनाचे सोन्याचे चैन,45 हजार रु.चे तीन दीड तोळा वजनाच्या सोन्याचे अंगळ्या , 21 हजार रु. ची एक 7 ग्राम वजनाची सोन्याची ठुसी असे साडेअठरा तोळ्याचे सोन्याचे दागिने व 7 हजार 500 रु किंमतीचे 25 तोळा वजनाचा चांदीचा करदोडा असा सुमारे 5 लाख 68 हजार रु.किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे याबाबत वंदना आलदर यांनी 22 नोव्हेंबर रात्री आठ ते 26 नोव्हेंबर रात्री पावणे बाराच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने वरील मुद्देमाल चोरून नेल्याबाबत फिर्याद दाखल केली आहे.