सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय आणि सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडिअम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनास गुरुवारपासून सुरुवात.

सांगोला (प्रतिनिधी) गुणवत्तेच्या बाबतीत सांगोला तालुक्यात आणि जिल्ह्यात एक वेगळाच ठसा उमटवणाऱ्या सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय, सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक विद्यालय व बालक मंदिर सांगोलाचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दिनांक १ डिसेंबर ते ३ डिसेंबर २०२२ या कालावधीत उत्साही वातावरणात संपन्न होणार आहे.
कोरोना विषाणू दोन वर्षाच्या कालखंडानंतर शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन हा शाळेचा अतिशय महत्त्वाचा उपक्रम असून या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून पहावयास मिळत आहे.यावर्षी १ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी साडेनऊ वाजता विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे तर कला प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे खजिनदार शं.बा. सावंत आणि कार्यकारणी सदस्य जगताप सर उपस्थित राहणार आहेत. दिनांक १ डिसेंबर रोजी सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय, पूर्व प्राथमिक विद्यालय व बालक मंदिर चा दुपारी १ वाजता सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
शुक्रवार दिनांक २ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी साडेनऊ वाजता फनी गेम व फुड स्टॉलचे उद्घाटन सांगोला येथील प्रसिद्ध आयुर्वेद आणि सौंदर्यतज्ञ डॉ.अनुप तोरणे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव म. शं घोंगडे उपस्थित राहणार आहेत. दुपारी एक वाजता सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल चा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी दहा वाजता नाशिकचे प्रसिद्ध वक्ते प्रशांत केंदळे यांच्या शुभहस्ते आणि संस्थाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे .सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सचिव म. शं. घोंगडे उपस्थित राहणार आहेत.
तरी या सर्व कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे, सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सरिता कापसे, पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी महारनवर, बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका सरिता देशमाने प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी सौरव दिघे, विद्यार्थिनी प्रतिनिधी गिताई घोंगडे, इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी प्रतिनिधी ओंकार पवार, विद्यार्थिनी प्रतिनिधी रिंकू पवार तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख चेतन कोवाळे आणि संतोष बेहरे यांनी केले आहे.