सांगोला महाविद्यालय सांगोला येथे टी.सी.एस. कंपनीच्या कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन
सांगोला महाविद्यालय, सांगोला येथे दिनांक 12/04/2025 रोजी टी.सी.एस. या नामांकित कंपनीचा प्लेसमेंट कॅम्प् आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले व प्लेसमेंट ऑफीसर प्रा.सुर्यकांत पाटील यांनी दिली.
सदरचे प्लेसमेंट टी.सी.एस.च्या बी.पी.एस. या विभागासाठी होत आहे. बी.पी.एस. साठी कला, वाणिज्य्, शास्त्र व तीन वर्ष डिग्रीचे इतर कोर्स, पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेल्या विदयार्थ्यांना संधी आहे. हा प्लेसमेंट ड्राईव्ह सन. 2023, 2024 व सन. 2025 साली पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. सदर नोकर भरतीसाठी येण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांनी https://shorturl.at/l8E8k या लिंक वरील नोंदणी अर्ज भरावा लागेल. तसेच प्लेसमेंट प्रक्रियेसाठी येताना कोणताही एक गव्हर्मेंट आय.डी. प्रुफ/ पासपोर्ट साईज फोटो व सर्व शैक्षणिक कागदपत्रे घेऊन शनिवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता महाविद्यालयात उपस्थित रहावे. सदर प्लेसमेंट प्रक्रियेचा नोंदणी अर्ज सांगोला महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर sangolacollege.org उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी सांगोला महाविद्यालयाच्या संगणक विभागाशी संपर्क साधू शकता किंवा 9423067068/ 9921530522/ 9404033227/ 9403471819 या मो.नं. क्रमांकावर संपर्क साधू शकता.



