सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

सिंचन प्रकल्पांतून आवर्तन सुरू झाल्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लागला – जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील आणि मी स्वतः टेंभू, म्हैसाळ आणि नीरा उजवा कालवा सिंचन प्रकल्पांतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष बाब म्हणून कोयना धरणातून टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे माण आणि कोरडा नदीत आवर्तन सोडण्याची तरतूद केली आहे. तसेच नीरा उजवा कालव्यातून देखील आवर्तन सोडण्यात येणार आहे. ऐन उन्हाळ्यात माण व कोरडा नदीत तसेच नीरा उजवा कालवा शाखा क्र.४ व ५ ला पाण्याचे आवर्तन सोडल्याने पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.

दुष्काळी परिस्थिती जनतेला दिलासा देण्यासाठी टेंभू योजनेतून माण नदीत, म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीत तसेच नीरा उजवा कालवा शाखा क्रमांक ४ व ५ ला पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील आणि मी स्वतः टेंभू, म्हैसाळ आणि नीरा उजवा कालवा सिंचन प्रकल्पांतून पुरेसे पाणी सोडण्यात यावे. म्हैसाळ योजनेचे पाणी कोरडा नदीत सोडण्यात यावे, तसेच टेंभू योजनेच्या पाण्याने माण नदीवरील बंधारे भरून द्यावेत अशी मागणी केली होती.

महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून कोयना धरणातून टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे माण आणि कोरडा नदीत आवर्तन सोडले आहे. तसेच नीरा उजवा कालव्यातून देखील आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सर्वच सिंचन प्रकल्पांतून पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!