सांगोला तालुका

गौडवाडी येथे कृषि विभागामार्फत हाॕर्टसॕप अंतर्गत डाळिंब पिकावरील शेतीशाळा संपन्न

दिनांक ०१/१२/२०२२ रोजी मौजे.गौडवाडी ता सांगोला येथे कषि विभागामार्फत फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प(हाॕर्टसॕप)अंतर्गत डाळिंब फळपिकावरील शेतीशाळा संपन्न झाली. सदरील शेतीशाळा रिसोर्स शेतकरी श्री नाना माळी यांचे डाळिंब प्रक्षेत्रावर घेण्यात आली. यावेळी तालुका कृषि अधिकारी शिवाजी शिंदे यांनी डाळिंबाची सद्यस्थिती, डाळिंब लागवड तंत्रज्ञान , ठिबकचा वापर,डाळिंब भौगोलिक मानांकन , अनारनेट नोंदणी , मनरेगा व भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत फळबाग लागवडीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. गौडवाडी परिसरातील तरुण शेतकऱ्यांचे डाळिंबामधील उत्कृष्ट नियोजनाबद्दल अभिनंदन केले.
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर चे शास्त्रज्ञ डाॕ मल्लीकार्जुन हरसुर यांनी डाळिंबावरील एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर चे शास्त्रज्ञ डाॕ सोमनाथ पोखरे यांनी कलमांची निवड , सुत्रकृमी व्यवस्थापन आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. डाळींब निर्यातदार श्री मयुर सपकाळ यांनी विविध देशांमध्ये डाळिंब निर्यातीसाठी आवश्यक मापदंड याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रश्नउत्तराचे माध्यमातुन डाळिंबावरील विविध बाबीवर शेतकरी, शास्त्रज्ञ व आधिकारी यांचेमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर शिवारफेरी करण्यात आली व किड व रोगांची ओळख व व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सदरील डाळिंब शेतीशाळेस गौडवाडी परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन कृषि पर्यवेक्षक सतिष देठे यांनी केले व आभारपदर्शन नवनाथ माळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि सहाय्यक मयुर माळी व विक्रम वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!