सोमवारी होणार २२ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन; मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय व मिरज रोड बायपास रस्त्याचे भूमिपूजन

मागील चार वर्षांमध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये रस्त्यांच्या कामांसाठी शेतीच्या पाण्याच्या योजनांसाठी तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी इतर मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी नगरपालिका प्रशासकीय इमारतीसह शहरातील विविध कामांना मोठ्या प्रमाणात भरघोस निधी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंजूर करून आणला आहे या निधीमधून सांगोला विधानसभा मतदारसंघातील गावां मध्ये मूलभूत सुविधा निर्माण झाल्याने विकास झाला आहे व अजूनही काही कामे प्रगतीपथावर असून काही कामांच्या निविदा प्रक्रिया चालू आहेत

सांगोला येथील विविध शासकीय कार्यालय जुनी झाली असून जागाही अपुऱ्या पडत असलेने कामकाजा करिता अडचण निर्माण होत होती परिणामी जनतेला कामासाठी हेलपाटे घालावे लागत होते ही गोष्ट लक्षात घेऊन आमदार शहाजीबापू पाटील यांनी सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली येण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाची शासनाकडे मागणी केली होती त्यासाठी तब्बल १२ कोटी निधी मंजूर करून घेतला आहे
सांगोला शहराच्या पश्चिम बाजूस दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या समोर ४०हजार ५००चौ. फूट तळमजल्यासह तीन मजली मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय इमारतीचे बांधकाम होणार आहे
तळमजल्यामध्ये तहसीलदार कक्ष निजी कक्षासह, सभागृह,उपनिबंधक कार्यालय, लोकअदालत विभाग, सेतू विभाग,पुरवठा विभाग,उपहारगृह,अभ्यागंत कक्ष, व महिला पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प व स्वच्छतागृह पोर्च तीन जिने लिफ्ट अशी सुविधा उपलब्ध असणार आहे,
पहिल्या मजल्यावर कृषी कार्यालय ,लागवड अधिकारी कार्यालय ,सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय,गृह रक्षक विभाग, सहयोगी प्राध्यापक कक्ष, अभ्यागंत कक्ष महिला व पुरुष दिव्यांग व्यक्ती साठी स्वतंत्र स्वच्छता ग्रह अशा सुविधा पहिल्या मजल्यावरती उपलब्ध असणार आहेत
दुसऱ्या मजलावर तहसील कार्यालय,तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय,सहकार विभाग, ऑडिटोरिअम, व्हिडिओ कॉन्फरन्स रूम, कॉन्फरन्स रूम, व्हीआयपी कक्ष, अभ्यागंत कक्ष, महिला पुरुष व दिव्यांग व्यक्तीसाठी स्वतंत्र स्वच्छता ग्रह ,अशी सर्व सोयीयुक्त सुसज्ज इमारत होणार असल्याने त्या परिसरात दिवाणी व फौजदारी न्यायालय, विविध उपसा सिंचन विभागाची कार्यालये वन विभागाचे व क्रीडा संकुल असल्याने सांगोला तालुक्यातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन सोमवार दिनांक ११ रोजी सकाळी १०:३० वाजता नूतन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर सांगोला येथे होणार आहे
त्याचबरोबर सांगोला शहराच्या दृष्टीने दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा वंदे मातरम चौक ते मिरज रोड रस्त्यासाठी दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर असून यामधून वंदे मातरम चौक ते मिरज रोड असा १६०० मीटर लांबीचा ७ मीटर रुंदीचा दोन्ही बाजूने काँक्रीट गटारसह काँक्रीट करण रस्ता या रस्त्याच्या कामाचे हे भूमिपूजन सोमवार दि ११ सकाळी १०:३० वाजता वंदे मातरम चौक महूद रोड येथे होणार आहे या दोन्ही कामांचे भूमिपूजन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते व माजी आमदार दीपक (आबा) साळुंखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमासाठी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब रुपनर, यांच्याह प्रा पी सी झपके सर, बाबुराव गायकवाड, चेतनसिंह केदार रफिक भाई नदाफ दादासाहेब लवटे तानाजी काका पाटील मधुकर बनसोडे खंडू तात्या सातपुते या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button