शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सांगोला विद्यामंदिरचा दबदबा कायम

जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत विविध गटांमध्ये सहा विद्यार्थी प्रथम तर तीन विद्यार्थी द्वितीय.
सांगोला ( प्रतिनिधी) जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा सन २०२२-२३ शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी आपटे प्रशाला पंढरपूर येथे संपन्न झाल्या यामध्ये विविध गटांमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या सहा विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये प्रथम क्रमांक तर तीन विद्यार्थ्यांनी द्वितीय प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले व जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचा दबदबा कायम ठेवला .
यामध्ये यशोलक्ष्मी विजय मगर, अनुष्का संजय गायकवाड ,महेक इरफान मुलाणी,पल्लवी बापू पाटील,पवन भाऊसो गायकवाड,अथर्व रविकिरण गायकवाड यांनी प्रथम क्रमांक मिळविला व स्वप्नजा तानाजी गवळी, संज्योत हरिश्चंद्र दौंडे, शाहीन जाविद मुलाणी. यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.तसेच सर्व विद्यार्थ्यांची विभागीय स्तरासाठी निवड झाली.
या सर्व विद्यार्थ्यांना सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा शिक्षक प्रा.सचिन चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले.तसेच प्रशाला क्रीडा विभाग प्रमुख सुनील भोरे, ज्युनिअर कॉलेज क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डी. के. पाटील, क्रीडा शिक्षक नरेंद्र होनराव, संतोष लवटे,सुभाष निंबाळकर याचे मार्गदर्शन मिळाले.
या धवल यशाबद्दल या सर्व गुणी विद्यार्थ्यांचा सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके व संस्था सचिव म.शं.घोंगडे यांचे हस्ते व प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे,उपप्राचार्य प्रा. गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले , पोपट केदार, बिभीषण माने, मार्गदर्शक क्रीडा शिक्षक प्रा.सचिन चव्हाण यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला व विभागीय स्तरासाठी शुभेच्छा दिल्या..
तसेच या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .व पुढील विभागीय स्तरासाठी शुभेच्छा दिल्या..