सांगोला तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

परिपूर्ण व्यक्तीत्वासाठी जीवनामध्ये खेळाचे महत्त्व – उपप्राचार्य गंगाधर घोंगडे
सांगोला (प्रतिनिधी)खेळामुळे शरीर निरोगी राहते त्यासोबत मनाला देखील निरोगी करण्यामध्ये खेळाची खूप मोठी भूमिका आहे.खेळामुळे शरीराच्या व्यायामाबरोबर मनाचा देखील विकास होतो. आपले मन प्रसन्न राहते व निरोगी राहते. व व्यक्तित्वच परिपूर्ण होते असे प्रतिपादन सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे यांनी केले.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय सांगोला व गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांगोला तालुका शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२२-२३ क्रिकेट या मैदानी स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे व सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण यांचे हस्ते येथील क्रीडा संकुलामध्ये दि.५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता झाले झाले. याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ क्रीडा शिक्षक दशरथ दिघे,तालुका क्रीडा संयोजक प्रा. डी. के . पाटील, तालुका क्रिकेट क्रीडा प्रमुख नरेंद्र होनराव व क्रीडा शिक्षक प्रा.अशोक पाटील उपस्थित होते.
सांगोला तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये खोखो, कबड्डी, व्हॉलीबॉल, कराटे, तायक्वांदो, कुस्ती, बुध्दीबळ, योगा, क्रिकेट या खेळांचे आयोजन करण्यात आले. आहे.यामध्ये ५ व ६ डिसेंबर रोजी तालुका क्रीडा संकुल सांगोला येथे १४, १७ व १९ वर्षे वयोगट मुले व मुली यांच्या तालुकास्तरीय क्रिकेट क्रीडा स्पर्धा संपन्न होणार आहे. याचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विधिवत श्रीफळ फोडून झाले. यावेळी हिम्मत साळुंखे,बाबर सर, स्नेहलकुमार धायगुडे, गणेश पवार, सुभाष निंबाळकर, देशमुख सर,अमोल इमडे, लखन निंबाळकर,तालुक्यातील क्रिकेट खेळाडू ,मार्गदर्शक क्रीडा शिक्षक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर स्पर्धेमध्ये तालुक्यातील १५ शाळांनी सहभाग नोंदवला होता.
यावेळी तालुका क्रिकेट क्रीडा प्रमुख नरेंद्र होनराव यांनी क्रिकेट खेळाच्या नियमासंदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका क्रीडा संयोजक प्रा.डी.के.पाटील यांनी केले.
व्यक्तीच्या प्रगतीसाठी शरीर आणि मन यांचा एकत्रित विकास होणे आवश्यक आहे.तो खेळामुळे शक्य आहे कारण शारीरिक श्रमांच्या खेळांत शरीरास भरपूर व्यायाम मिळतो त्यामुळे शरीर काटक व बळकट बनते. तसेच खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडू वृत्ती इ. गुणांचीही वाढ होते. सांघिक खेळामुळे सहकार्याची वृत्ती, संघभावना व नेतृत्वगुण यांना वाव मिळतो आणि या गुणांचा जीवनात विविध प्रसंगी उपयोग होतो.
ला.प्रा.धनाजी चव्हाण
अध्यक्ष लायन्स क्लब सांगोला