राजकीय

नमामि चंद्रभागा परियोजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची खा. रणजितसिंह निंबाळकर यांची मागणी

मुळा-मुठा नदी राज्यातील सर्वात जास्त प्रदूषित नदी असून या नदीचे पाणी उजनी धरणात सोडले जात असल्याने उजनी धरणातील पाणी जास्त प्रदूषित झाले आहे. उजनी धरणातील पाण्याचा वापर सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नमामि चंद्रभागा परियोजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी लोकसभेत केली आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळा-मुठा नदीच्या राज्यातील सर्वात जास्त प्रदूषित नदी असून या नदीच्या काठावर अनेक औद्योगिक वसाहती असल्याने कारखान्यातील रासायनिक सांडपाण्याचा प्रवाह थेट नदीपात्रात येत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. अनेक उद्योगंचे केमिकलमिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी प्रदूषण मोठी डोकेदुखी बनले आहे. प्रदूषित पाणी चंद्रभागा नदीतून येत असल्याने लाखो नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. प्रदूषित पाणी थेट चंद्रभागा नदीत तसेच उजनी धरणात येत असल्याने धरणातील पाणी प्रदूषित झाले असून पाण्यावर तेलाचा तवंग निर्माण झाला आहे. दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरपुरात येवून चंद्रभागा नदीत स्नान करीत असतात. तसेच उजनी धरणाचे पाणी सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी वापरले जात आहे. प्रदूषित पाणी चंद्रभागा नदीतून येत असल्याने लाखो नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
प्रदूषित झालेल्या चंद्रभागा नदी व उजनी धरणाची दखल खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी घेतली असून त्यांनी लोकसभेत यावर आवाज उठवला आहे. केंद्र सरकारच्या नमामि चंद्रभागा परीयोजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगितले आहे. यासाठी केंद्र शासनाने नमामी चंद्रभागा या योजनेतून चंद्रभागा नदीत थेट येणार्‍या पाण्याचे शुध्दीकरण करुन ते पाणी नदीत सोडण्याची मागणी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी लोकसभेत केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!