सांगोला विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलन पहिले पुष्प निवडणूक संपन्न

शिक्षक दिन प्राचार्य,जनरल सेक्रेटरी, विद्यार्थींनी प्रतिनिधी यांची झाली निवड
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२२- २३दिनांक २२,२३,२४ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न होणार आहे यासाठी इयत्ता पाचवी ते दहावी प्रशालेतून व ज्युनिअर कॉलेजमधून शिक्षक दिन प्राचार्य,जनरल सेक्रेटरी, विद्यार्थींनी प्रतिनिधी यांची निवडणूकीद्वारे निवड केली जाते. यामध्ये प्रत्येक वर्गातील गुणांनुक्रमे प्रथम विद्यार्थी हा वर्ग प्रतिनिधी असतो व सर्व वर्ग प्रतिनिधीमधून निवडणूकीद्वारे वरील तीन पदांची निवड केली.
यामध्ये सन २०२२-२३ वार्षिक स्नेहसंमेलन प्रशाला शिक्षक दिन मुख्याध्यापकपदी सानिका तानाजी पाटील १० वी ब, जनरल सेक्रेटरी अस्मिता विष्णू जाधव १० वी ग, विद्यार्थींनी प्रतिनिधी विदिशा सिद्धेश्वर इंगोले व ज्युनिअर कॉलेज शिक्षक दिन प्राचार्यपदी वैष्णवी वैभव ढोबळे १२ वी कला अ, जनरल सेक्रेटरी स्वाती दगडू हजारे १२ वी वाणिज्य,विद्यार्थींनी प्रतिनिधी सायली दत्तात्रय दीक्षित १२ वी संयुक्त वाणिज्य यांची निवडणूकीद्वारे निवड झाली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सचिव म.शं.घोंगडे, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे उपप्राचार्य प्रा गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभीषण माने यांचे हस्ते प्रशाला सहाय्यक निवडणूक विभाग दादासाहेब वाघमोडे, ज्युनिअर कॉलेज निवडणूक विभाग प्रमुख प्रा.डी.के.पाटील , सहाय्यक निवडणूक विभाग प्रा.एन.डी.बंडगर प्रशाला उत्सव विभाग प्रमुख नरेंद्र होनराव व ज्युनिअर कॉलेज उत्सव विभाग प्रमुख प्रा.धनाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्था अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत,सर्व संस्था कार्यकारणी सदस्य शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.