सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांतदादा देशमुख यांचा महिम येथे संवाद दौरा उत्साहात संपन्न; समर्थकांनी केले कॉर्नर सभेचे आयोजन

सांगोला (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे विद्यमान सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीकांतदादा देशमुख यांचा महिम गाव भेट संवाद दौरा नुकताच संपन्न झाला. या दौर्‍यात कॉर्नर सभेचे आयोजन त्यांच्या समर्थकांनी केले होते. कॉर्नर सभेच्या ठिकाणी वाद्य वाजवून व फटाक्यांचे आतिषबाजी करत प्रति दिवाळी साजरी करण्यात आली.
या दौर्‍यात त्यांच्यासोबत राज्याचे किसान मोर्चाचे उपाध्यक्ष शशिकांतभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार, भटक्या विमुक्त जाती आघाडीचे भाजपाचे राज्य उपाध्यक्ष विजय इंगवले, महूदचे राजाभाऊ येडगे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार महीम विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिगंबर कारंडे, डॉ.राजकुमार डिकोळे, गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव गोरवे यांचे हस्ते करण्यात आला.
सदर कॉर्नर सभेचे तगडे आयोजन किसान मोर्चाचे भाजपाचे जिल्हा सचिव रवीभाऊ पाटील व त्यांचे सहकारी सोमनाथ बंडगर, किरण चौगुले, समाधान बंडगर, सतीश पाटील, विवेक नायकुडे, अनिकेत मरगळ, सेवागिरी चव्हाण, तेजस आढाव, बबलू साठे, संग्राम मरगळ यांनी केले. प्रास्ताविक गणेश पाटील यांनी केले तर सोमनाथ बंडगर यांनी गावातील ग्रामस्थांच्या समस्या मांडल्या. यामध्ये निरा उजवा कालव्याचे 95-3 फाट्याला पाण्याची पाळी सोडून पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. दुधाच्या अनुदानाच्या समस्या किरण चौगुले व शेतकर्‍यांनी मांडल्या त्या सोडवण्याचे श्रीकांतदादांनी आश्वासन दिले.
यावेळी श्रीकांतदादा देशमुख म्हणाले की, लोकसभा निवडणुकीअगोदर तालुक्यातील जनतेशी व समर्थकांशी संवाद साधावा, छोटी मोठी कामे मार्गी लावावी, आपल्या लोकांना इतरांकडे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून हा धावता गाव भेट संवाद दौर्‍याचे तालुका भर आयोजन केले आहे. महिम राजकीय दृष्ट्या जागृत गाव आहे त्यासाठी लोकसभेच्या प्रचारासाठी ही एक दौरा करणार आहे. पुढील काळात पूर्ण वेळ आपली सेवा करणार असल्याचे श्रीकांतदादांनी सांगितले, यामुळे कार्यकर्ते समर्थकांत ऊर्जा निर्माण झाली.
ही कॉर्नर सभा यशस्वी करण्यासाठी महिम गावातील ज्येष्ठ नेते मिलिंद मरगर, अशोक शेंडे, राहुल मरगर, दत्ता भुसनर, समाधान महापुरे, युवा नेते बळी शिरगिरे, अनिल शेंडे, दत्तात्रय बंडगर, रवी बंडगर, किसन धोत्रे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महीम पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी, बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!