सांगोला तालुका

स्व.भाई गणपतराव देशमुख यांची पुण्यतिथी व जयंती सामाजिक उपक्रमानी होणार साजरी

30 जुलै रोजी स्व.भाई. गणपतराव देशमुख यांचा पुण्यतिथी सोहळा  सांगोला सुतगिरणी येथे तर 10 ऑगस्ट रोजीचा जयंती कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे आयोजित करण्यात येणार आहे. 31 जुलै ते ते 9 ऑगस्ट या दरम्यान सांगोला तालुक्यातील  गट वाईज विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुण्यतिथी व जयंतीनिमित्त सर्व रोग निदान शिबिरे, वृक्षारोपण, वही वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊ वाटप, रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, शालेय स्पर्धा, फळ लागवड, निंबध स्पर्धा, शिलाई मशीन वाटप आधी सामाजिक उपक्रम राबबिण्यात येणार आहेत.

स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथी व जयंती नियोजन संदर्भात विचार विनीमय करण्यासाठी काल शनिवार दि. 15 जुलै रोजी दुपारी 1 वाजता डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुत गिरणी मर्या. सांगोला येथे बैठक संपन्न झाली.यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख,प्रा.विठ्ठलराव शिंदे सर, चिटणीस दादासाहेब बाबर, डॉ.प्रभाकर माळी, अ‍ॅड.नितीन गव्हाणे, प्रा.नानासाहेब लिगाडे, मारुतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, इंजि.रमेश जाधव, समाधान पाटील, अरुण पाटील, यांच्या सह सर्व सहकारी संस्थाचे सभापती, उपसभापती,  चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक,  सरपंच, उपसरपंच त्याच प्रमाणे पक्षाचे व पुरोगामी युवक संघटना कार्यकर्ते पदाधिकारी, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व.आबासाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त 30 जुलै रोजी पंकज महाराज यांचे कीर्तन, पुष्पवृष्टी, महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे तर दहा ऑगस्ट रोजी सांगोला न्यू इंग्लिश स्कूल येथे स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचा पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम होणार आहे.त्याचप्रमाणे  सामाजिक उपक्रमासाठी 1 ऑगस्ट रोजी कोळा गटासाठी, 2 ऑगस्ट रोजी महुद गटासाठी, 3 ऑगस्ट रोजी चोपडी गटासाठी , 4  ऑगस्ट रोजी एखतपुर  गटासाठी, 5 ऑगस्ट रोजी घेरडी गटासाठी, 6 ऑगस्ट रोजी जवळा गटासाठी, 7 ऑगस्ट रोजी कडलास गटासाठी, 8 ऑगस्ट रोजी सांगोला शहरासाठी तर 9 ऑगस्ट रोजी भाळवणी गटासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे जयंती निमित्त पुतळा अनावरण सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांना आमंत्रित करण्याचा विचार सुरू असून यासंदर्भात 17 जुलै रोजी मुंबई येथे त्यांची भेट घेण्यात येणार आहे.

यावेळी नंदकुमार शिंदे, सुब्राव बंडगर, दीपक गोडसे, प्रशांत वलेकर, विनायक कुलकर्णी, अ‍ॅड.धनंजय मेटकरी, कल्पनाताई शिंगाडे, हराळे साहेब, नारायण पाटील, बाळासाहेब बनसोडे, सुरेश लवटे सर, दत्ता नरळे, शहाजी गडहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्व.आबासाहेब यांची पुण्यतिथी व जयंती सामाजिक उपक्रम राबवून साजरी करणार असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक प्रा.विठ्ठलराव शिंदे सर यांनी केले.सूत्र संचालन दीपक गोडसे यांनी तर सर्वांचे स्वागत  व आभार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!