सांगोला तालुका

एलकेपी मल्टीस्टेट सांगोला शाखेचा व कार्पोरेट ऑफिसचा लोकार्पण सोहळा उत्साही वातावरणामध्ये संपन्न .

सांगोला(प्रतिनिधी):- एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या सांगोला शाखेचा व कॉर्पोरेट ऑफिसचा लोकार्पण सोहळा रविवार दि.11 डिसेंबर रोजी सांगोला येथे अत्यंत चैतन्यदायी व उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. माणदेशी व रांगड्या बोलीभाषेचा गौरव ज्यांच्यामुळे देशभरामध्ये झाला असे सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शब्दप्रभू अ‍ॅड.शहाजीबापू पाटील, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, श्रीमती रतनकाकी गणपतराव देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष उद्योजक चेतनसिंह केदार, फॅबटेक उद्योग समूहाचे प्रमुख भाऊसाहेब रुपनर इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

सांगोला शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये नेहरू चौकातील एका प्रशस्त इमारतीमध्ये ही शाखा सुरू करण्यात आलेली आहे. सहकाराचा व आर्थिक संस्था चालवण्याचा सुमारे सतरा-अठरा वर्षापासूनचा प्रदीर्घ अनुभव असलेले चेअरमन अनिलभाऊ इंगवले व तितकेच अनुभवी असलेले सहकारी जगन्नाथ भगत गुरुजी, डॉ. बंडोपंत लवटे व सुभाष दिघे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली मल्टीस्टेटच्या शाखा विविध ठिकाणी कार्यरत असून पुणे-मुंबईच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कार्पोरेट बँकांसारखे सुसज्ज फर्निचर, उत्कृष्ट ब्रँडिंग, उत्साही व कार्य तत्पर स्टाफ, सर्व प्रकारच्या अत्याधुनिक बँकिंग प्रणाली अशा सर्व सुविधांनी युक्त असलेल्या एल के पी मल्टीस्टेटच्या या शाखेमुळे सांगोल्याच्या वैभवात मोठी भर पडली असल्याचे मत यावेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केले.
सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांच्यासह या चार तरुणांनी सन 2010 पासून सूर्योदय या नावाने अनेक संस्था उभ्या केल्या आहेत. त्या माध्यमातून शेकडो तरुणांच्या हाताला काम प्राप्त झाले असून अप्रत्यक्ष हजारो कुटुंबीयांच्या प्रगतीला मोठा हातभार लागलेला आहे. सूर्योदय उद्योग समूहाची वित्तीय क्षेत्रातील व्यापक वाटचाल म्हणजे एलकेपी मल्टीस्टेट ही संस्था आहे. 2 राज्यांमध्ये अनेक शाखांच्या माध्यमातून ग्राहकांचे सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या संस्थेच्या कार्पोरेट ऑफिसचे उद्घाटन सांगोला येथे संपन्न झाले. एलकेपी मल्टीस्टेटच्या विविध योजनांची आणि सुविधांची समग्र माहिती असलेल्या दिनदर्शिकेचेही प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. या संस्थेमध्ये कर्जाच्या विविध योजनांबरोबरच बचतीच्या व ठेवीच्या अनेक आकर्षक योजना विशेषतः 36 महिन्यांची पेन्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत लाभदायी आहे.

यावेळी डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील, माजी सभापती संभाजी गावकरे, अजयसिंह इंगवले, माऊली तेली, डॉ.निकिता देशमुख, डॉ.सुरज रुपनर, डॉ.संतोष पिसे, उद्योजक अमोल खरात, परमेश्वर गेळे, ज्ञानेश्वर इमडे, रमेश अनुसे, ज्येष्ठ पत्रकार मोहन मस्के सर, प्रशासकीय अधिकारी अस्मिता निकम, राजेंद्र यादव सर, गुलाबराव पाटील,संतोष इंगवले, विजय इंगवले, हिंदुराव घाडगे सर, सीए.उंटवाले व रोडगे साहेब, दीपक बंदरे, प्रशांत पाटील, सुनील नष्टे, इंजि.रमेश जाधव साहेब, महेश नष्टे, अ‍ॅड. गजानन भाकरे , संतोष घाडगे ,सुभाष अनुसे, सूर्योदय परिवारातील सर्व सदस्य आणि मित्रमंडळी, गोविंदबापू सोनलकर, सौदागर दिघे, किरणभाऊ पांढरे, महादेव दिघे यांच्यासह राजकारण, उद्योग, व्यवसाय, व्यापार ,शिक्षण, आरोग्य ,कला अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!