तालुकास्तरीय क्रीडास्पर्धेत उत्कर्ष विद्यालयाचे उज्वल यश!

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय सांगोला व गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
सांगोला तालुका शालेय क्रीडा स्पर्धातील ‘ॲथलेटीक्स’ या क्रीडा प्रकारात उत्कर्ष विद्यालयाने उज्वल यश संपादित केले आहे.
आदित्य हणमंत नरळे (१०वी) याने १०० मी धावणे या प्रकारात तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला. आशुतोष अनिल कोडग(१०वी) याने ११०मी अडथळा शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला. ५किमी चालणे या प्रकारात शिवम चौधरी (१०वी) याने तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला.तसेच पृथ्वीराज बंडगर (९वी) याने ५किमी चालणे प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय फेरी गाठली. तसेच
14 वर्षीय मुली-वैष्णवी भाकरे – थाळीफेक – प्रथम क्रमांक
17 वर्षीय मुली- गंगामाई खांडेकर – भालाफेक -तृतीय क्रमांक गंगामाई खांडेकर- तीन किलोमीटर चालणे- द्वितीय क्रमांक,सानिका लेंडवे – एकशे दहा मीटर अडथळा शर्यत – तृतीय क्रमांक तसेच स्मिता गडहिरे – एकशे दहा मीटर अडथळा शर्यत – चतुर्थ क्रमांक या विद्यार्थिनींनी दमदार कामगिरी करत मैदानी खेळाची जिल्हास्तरीय फेरी गाठत विद्यालयाची मान उंचावली.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थाध्यक्षा संजीवनी ताई केळकर तसेच सर्व संस्थापदाधिकारी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. सुनील कुलकर्णी सर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मागाडे बाई, दोन्ही विभागाचे पर्यवेक्षक तसेच शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातून कौतुक होत आहे.या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. सचिन गोतसूर्य सर व रवी कुंभार सर यांचे मार्गदर्शन लाभले.