सांगोला येथील क्रीडासंकुलात दि. १०/८/२०२४ व दि. १२/८/२०२४ रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या १७वर्षेवयोगटातील मुलींनी द्वितीय क्रमांक पटकावला तर १४वर्षे वयोगट मुले व १७वर्षे वयोगट मुले यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री. सुभाष निंबाळकर व श्री. संतोष लवटे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थाध्यक्ष श्री. प्रबुध्दचंद्र झपके, संस्थासचिव श्री. मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव श्री. प्रशुध्दचंद्र झपके, खजिनदार श्री. शं. बा. सावंत, कार्यकारिणी सदस्य श्री. विश्वेश झपके यांच्यासह, विद्यालयाच्या प्र. मुख्याध्यापिका कु. सुकेशनी नागटिळक व सर्व संस्था सदस्य यांनी यशस्वी संघाचे अभिनंदन केले.