सांगोला महाविद्यालयात सद्भावना दिन साजरा

सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ, संचलित सांगोला महाविद्यालयात, भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती स्मरणार्थ मंगळवार दि.20 ऑगस्ट हा दिवस सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिवसाच्या निमित्ताने भारतातील समरसता, राष्ट्रीय एकात्मता, शांतता, प्रेम आणि आपुलकी वाढविण्याच्या हेतूने सद्भावना दिवस साजरा केला जातो.
यासाठी सर्वांनी प्रर्यत्नशील असावे व सर्वांशी समानतेने वागावे इतरांबदद्ल चांगली भावना ठेवावी, उच्च ध्येय असावे असे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ. सुरेश भोसले यांनी केले. महाविदयालयात सद्भावना दिनाची प्रतिज्ञा आय.क्यु.ए.सी. कोऑर्डीनेटर डॉ. राम पवार यांच्या मागदर्शनाखाली डॉ. अमोल पवार यांनी दिली. तर सद्भावना दिनाची प्रतिज्ञा वाचन डॉ. व्ही.एस.गाडेकर यांनी केले. श्री.बाबासो इंगोले व श्री.शंकर माने यांनी सहकार्य केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेसह विदयार्थी उपस्थित होते.