सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या पालकांसाठी कार्यशाळा संपन्न

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या  इ.1 ली ते 6वीच्या पालकांसाठी विद्यामंदिर प्रशाला येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस कु.मानसी गगधनी, जळगाव यांनी मार्गदर्शन केले.या वेळी संस्थाध्यक्ष श्री.प्रबुध्दचंद्र झपके सर,श्री.अमृत पाटील सर उपस्थित होते.तत्पूर्वी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.सरिता कापसे मॅडम यांनी गगधनी मॅडम यांचा सत्कार व स्वागत केले. कु.दिपाली बसवदे यांनी पालक कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शिका गगधने मॅडम यांचा परिचय करून दिला.
गगधनी मॅडम यांनी प्रामुख्याने सी. बी. एस. ई. अभ्यासक्रमाचे महत्व, पालकांची भूमिका व स्वयंअध्ययन या प्रमुख विषयांवरती पालकांशी संवाद साधला. यावेळी पालकांना मार्गदर्शन करताना त्यांनी सी. बी. एस.ई अभ्यासक्रमाचा भविष्यात निश्चित फायदा होईल हे सांगून मुलांच भविष्य हे पालकांच्या हातात असतं  त्यामुळे आपल्या मुलांना वेळ द्यावा तसेच पालक हे मुलांसाठी आरसा असतात. त्यामुळे पालक जसे वागतील तसच मुलं वागत असतात म्हणून त्यांच्याशी विचारपूर्वक बोला. मुलांच्या प्रयत्नांचे कौतुक करा त्यांना प्रोत्साहन द्या.त्यांच्या उपक्रमामध्ये सामील व्हा.त्यांच्याबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवून त्यांना आपल्या कृतीतून प्रत्येक गोष्टींची जाणीव करून द्यावी म्हणजे नक्कीच त्यांच्यामध्ये चांगले बदल घडून येतील. यावेळी उपस्थित पालकांनी आपल्या पाल्याच्या संदर्भात असणाऱ्या विविध समस्या सांगून त्यावरील उपाययोजना जाणून घेतल्या.या कार्यशाळेसाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.लता देवळे यांनी केले तर कु. पल्लवी थोरात यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button