राष्ट्रपुरुषांच्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ महुद बंद व रास्ता रोको यशस्वी

सांगोला(प्रतिनिधी):-छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाबत अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ महुद ग्रामस्थांनी गाव बंद व रास्ता रोको करण्यात आला.बंद मध्ये व्यापारी, लहान मोठे व्यावसायिक यांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवला होता.
सदर आंदोलनामध्ये सरपंच सौ.संजीवनी कल्याण लुबाळ,उपसरपंच वर्षा धनंजय महाजन, सुर्यकांत घाडगे, खंडू सातपुते, अॅड. धनंजय मेटकरी, अभिषेक कांबळे, अरुण नागणे, अतुल बाबर यांनी आपले विचार व्यक्त केले व या सर्व बेलगाम वक्तव्य करणार्या लोकांचा निषेध करण्यासाठी व जे 11 पोलीस कर्मचारी विनाकारण निलंबित केले आहेत त्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी महुद ग्रामस्थांनी गाव बंद आंदोलन व रास्ता रोको आंदोलन शांततेने केल्याचे सांगीतले.
निवेदन सांगोला पोलिस स्टेशनचे एपीआय हुले यांना देण्यात आले. यावेळी महुद गावचे बाळासाहेब पाटील, बाबुराव नागणे, उमेश चव्हाण, अंकुश येडगे, संतोष पाटील, संजय पाटील, महादेव येळे, कैलास खबाले, काका नागणे,विजय खंबाले, लाला मुलाणी, पवन बाजारे, पंपु धोकटे, दिगंबर येडगे, प्रकाश जाधव, दादा महाजन, दादा कांबळे, हरिभाऊ येडगे, दौलत कांबळे, लिंगराज येडगे, नवनाथ येडगे, मोहन जाधव, दामु मोरे, विक्रम पाटील, सतिश अर्जुन, दत्ता सातपुते, अरुण चव्हाण, सिध्देश्वर मेटकरी, चंद्रशेखर कांबळे, दत्तात्रय डोंगरे या ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.महुद मधील
आंदोलन यशस्वी करण्यासाठी उध्दव सरतापे, विजय सरतापे, जयंत बाबर, भागवत सरतापे, शैलेश सरतापे, नवनाथ सरतापे, विकास सरतापे, उमेश खरात, लिंगा वाघमारे, बाबा सरतापे, मयुर मागाडे, सुरज मागाडे, देविदास गोफणे, प्रल्हाद जाधव, संतोष सरतापे, बाळु सरतापे, पिंटु सरतापे, गजेंद्र सरतापे, दिगंबर सरतापे, सुर्यकांत सरतापे, प्रविण सरतापे, हनुमंत बाबर, आकाश सरतापे, आदर्श सरतापे, मारुती सरतापे, निखिल सरतापे, सौरभ सरतापे, विनोद सरतापे, मयुर मागाडे, हेमंत बाबर, अजय पारसे, आशुतोष बाबर,करण बाबर, आदित्य खरात यांनी परिश्रम घेतले असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली