सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचे विविध स्पर्धेमध्ये घवघवीत यश

सांगोला(प्रतिनिधी):- रंगोत्सव सेलीब्रेशन आयोजीत नॅशनल लेवल आर्ट मुंबई विविध स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.या स्पर्धेत 19 गोल्ड मेडल, 10 सिलव्हर मेडल, 5 ब्रांज मेडल पटकाविले. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल मार्गदर्शक शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या रंगोत्सव सेलीब्रेशन आयोजीत रंगभरण स्पर्धा, कोलाज काम स्पर्धा, हस्ताक्षर, प्रिंट मेकींग स्पर्धा, ग्रेटींग कार्ड स्पर्धा, फोटो ग्राफी स्पर्धा इ.स्पर्धेचे स्वरुप होते. या स्पर्धेमध्ये विद्यालयाचे इ.1 ली ते 4 थी मधील 364 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये 45 विद्यार्थ्यांनी यश संपादित केले असून यामध्ये इ.4 थी मधील कु.गौरी नागेश लवटे हिने हस्ताक्षर स्पर्धेमध्ये व्दितीय क्रमांक पटकाविला.इ.2 री मधील कु.प्रत्युष विनायक मस्के याने गोल्ड मेडल पटकाविले. इ.1ली मधील कु.देवश्री उदय बोत्रे व इ.3 री मधील फाल्गुनी विशाल खडतरे रंगभरण स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पटकाविले. त्याचप्रमाणे इ.1 ली मधील काव्या श्रीकांत साळे, विराज भाऊसाो सुर्यवंशी, ईश्वरी सुभाष पाटील, गौरी हनुमंत भोसले, प्रणाली सागर गायकवाड, गौरी सोमनाथ ढोले, सार्थक हनुमंत भोसले, स्वरा रमेश वाघमारे, इ.2री मधील किशोरी सुनिल वाळके, अनुष्का सचिन व्हनमाने, अल्फिया इकबाल शेख, अनुश्री नागेश तेली, प्रत्युष विनायक मस्के, हर्षदा विशाल दौंडे, विवेक संतोष टकले, जान्हवी मधुकर इमडे, इ.3 री मधील तन्वी तुषार खडतरे, रोहित नितीन गावडे, कार्तिक रमेश वाघमारे, विराज धनंजय पाटील, सार्थक प्रशांत दिवटे, अली जमील शेख, स्वराज शंकर पाटील, इ. 4 थी मधील आरोही गणेश अडसूळ , सानवी अमोल गायकवाड, अक्षरा अजित नवले, आदित्य दिगंबर पवार, प्रज्वलिता कुंडलिक पवार, आराध्या प्रतापसिंह इंगवले, संस्कार नारायण नवले, रिदा मुबीन काझी, सिमरन संभाजी शिनगारे,आयुष तानाजी घाडगे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन विद्यालयाच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना मागदर्शक करणारे श्री.समाधान शिंदे सर व श्री.मेहराज मण्यार सर यांना कलाजिवी अॅवार्ड देवून सन्मानीत करण्यात आले. तर विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक श्री.उदय बोत्रे सर यांना कृतीशील मुख्याध्यापक पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.त्याचप्रमाणे विद्यालयास अभिनंदनपर स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके, संस्था सचिव म.श.घोंगडे, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था सदस्य विश्वेश झपके तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य, प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे व परिवारातील सर्व प्रशासकीय वर्ग आदींनी अभिनंदन केले