मोरया स्टील अँड फर्निचरचे शानदार उद्घाटन सोहळा

सांगोला (प्रतिनिधी):- आधुनिकीकरणाकडे आपण जात आहोत त्यामुळे मिसाळ बंधूंनी चांगला व्यवसाय सुरू केला आहे. घराला सुशोभीकरणासाठी सर्वांना फर्निचरची गरज असते. ही गरज लक्षात घेवून मिसाळ बंधूंनी अतिशय आधुनिक फर्निचर विक्रीला ठेवले आहे.त्यामुळे मोरया स्टील अँड फर्निचर हे शोरुम भरभराटीने चालेल असा विश्वास आम. शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.
सांगोला येथे नव्यानेच सुरु होत असलेल्या मोरया स्टील अॅन्ड फर्निचर या फर्मचा उद्घाटन सोहळा सोमवार दि.12 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता काळभैरवनाथ श्रीक्षेत्र सोनारी येथील मा.श्री.संजय महाराज पुजारी व आ.शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले की, सांगोला तालुक्यात सध्या चांगले व नवीन वातावरण तयार झाले आहे. चिणके गावात जसे चांगले वातारण आहे तसेच वातावरण आम्ही सगळ्या तालुक्यात करणार आहोत.गेली 50 वर्षे थांबलेला विकास करण्यासाठी आम्ही दोघे हातात हात घालून काम करणार असून महिला समक्ष करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. घरामध्ये फर्निचर घेण्यासाठी आपण मोरया स्टील अँड फर्निचर या दुकानाला प्राधान्य दिले पाहिजे असे सांगत मिसाळ परिवाराच्या नवीन उद्योगासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी काळभैरवनाथ श्रीक्षेत्र सोनारी येथील मा.श्री.संजय महाराज पुजारी यांनी भरुभरून उत्साहाने दुकान चालत राहील असा आशीर्वाद दिला.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सतीश पाटील, विनायक मिसाळ, सतीश सावंत, अरविंद केदार, सतीश मोहिते, विष्णू मिसाळ, डॉ.नवनाथ मिसळ, भगवान माने गुरुजी, तानाजी मिसाळ, उत्तम माने, मोहन मिसाळ सर, हितेश आलदर, भीमराव मिसाळ, शिवकुमार शिंदे, नामदेव आलदर, यांच्यासह चिनके येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांचे स्वागत अमोल मिसाळ यांनी केले.