शिवपार्वती महिला रुद्र मंडळाच्या अध्यक्षपदी सौ.छाया तेली तर उपाध्यक्षपदी सौ.शुभांगी तेली

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला शहरातील सामाजिक क्षेत्रात नावलौकीक असलेल्या शिवपार्वती महिला रुद्र मंडळाच्या अध्यक्षपदी सौ.छाया तेली तर उपाध्यक्षपदी सौ.शुभांगी तेली यांची एकमताने निवड करण्यात आली.
शिवपार्वती महिला मंडळाचा दुसरा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिन कार्यक्रमासाठी सौ. महादेवी कोणदे व सौ अरुणा घोंगडे या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या.यावेळी सौ छाया हेमंत तेली यांची अध्यक्ष पदी तर सौ शुभांगी अनंत तेली यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी मंडळाकडून माजी अध्यक्षा सौ सरोजिनी पाटणे व सचिव सौ सुवर्णा तेली यांनी वर्षभर घेतलेले उपक्रम व स्पर्धा यांचे बक्षीस वितरण करण्यात आले. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातंर्गत महिलांचा विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.सूत्रसंचलन सौ.अनुपमा गुळमिरे तर आभार संध्या तेली यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.