सांगोला तालुका
जवळे विद्यालयाच्या कबड्डी संघाला किट भेट.
कै. सौ. वत्सला देवी देसाई विद्यालय व कै. अण्णासाहेब घुले सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळे या प्रशालेच्या मुले आणि मुलींच्या कबड्डी संघाला भोपसेवाडी येथील कबड्डी प्रेमी डॉ.लक्ष्मण कोळेकर, मा.अक्षय यमगर मा. सागर गावडे यांच्या वतीने किट भेट देण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य श्री बाळासाहेब शिंदे सर, क्रीडाशिक्षक श्री ए.के पाटील सर श्री चडचणकर सर, श्री लांडगे सर श्री महेश भोसले, श्री विशाल चडचणकर श्री चंद्रकांत नरळे उपस्थित होते.