महूद शाळेत मुलांनी भरवला बाजार.

मंगळवार दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी जि.प. प्रा.शाळा महूद येथे विद्यार्थ्यांनी बाजार भरवला होता.बाजाराचे उद्घाटन महुदच्या सरपंच सौ.संजीवनीताई लुबाळ व उपसरपंच सौ.वर्षा महाजन यांच्या शुभहस्ते झाले.

इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी ताजी फळे,पालेभाज्या, भाजीपाला,भेळ,पाणीपुरी,धपाटे दही,शैक्षणिक साहित्य,वेतकामाच्या वस्तू अशा विविध वस्तूंचे स्टॉल्स लावलेले होते.गावातील नागरिकांनी, शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनीही खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला.विक्रीसाठी आणलेल्या वस्तू पैकी जवळजवळ ९५ % साहित्याची विक्री झाली.विद्यार्थी आपल्या मालाचा खप व्हावा म्हणून चांगले प्रयत्न करत होते.होणारी विक्री आणि झालेला नफा पाहता विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले.विद्यार्थ्यांना गणिती क्रियांचा वापर खरेदी विक्रीसाठी करता आला.बाजारात २५ हजाराचे पुढे उलाढाल झाली.यावेळी केंद्रप्रमुख श्री रवींद्र पाटील,ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील,सौ.विद्या नैनेश कांबळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष पाटील,उपाध्यक्ष सुनील जाधव,सदस्य कैलास खबाले,शकील तांबोळी,दीपक पवार,युवानेते कल्याण लुबाळ,मोहन जाधव,उमेश चव्हाण उपस्थित होते.सांगोला सहकारी सूतगिरणीसाठी संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल संतोष पाटील यांचा सत्कार यावेळेस करण्यात आला. कै.जयवंतराव पाटील( पिंटू आप्पा) यांचे स्मरणार्थ ठेवण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरणही यावेळेस करण्यात आले. स्पर्धेतील सत्यजित हणमंत जाधव,संग्राम सतीश जाधव, सुशांत सोमनाथ जाधव,आनय अनिल चव्हाण,प्रशांत मनोहर घाडगे या विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.