मैदानी स्पर्धेत नाझरा विद्यामंदिर ची प्रणाली बनसोडे हिचे यश

नाझरा(वार्ताहर):- सांगोला येथे तालुका क्रीडा संकुलात पार पडलेल्या तालुकास्तरीय वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत नाझरा विद्यामंदिर प्रशालीची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी प्रणाली मुकुंद बनसोडे हिने 100 मीटर धावण्यात व लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थिनीस क्रीडा शिक्षक चारुदत्त जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, मुख्याध्यापक अमोल गायकवाड, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्यासह सर्व शिक्षकांनी केले.सदर विद्यार्थिनीची निवड जिल्हास्तरीय वैयक्तिक मैदानी स्पर्धेसाठी झाली आहे.