मांजरी विद्यालयात शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

मांजरी (ता.सांगोला) येथील रयत शिक्षण संस्थेच्या मांजरी हायस्कूल मांजरी विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचा 82 वा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य श्री.केदार आर.बी हे होते तर प्रमुख पाहुणे सांगोला पंचायत समितीचे उपसभापती श्री.नारायण जगताप व प्रमुख वक्ते म्हणून श्री.दत्तात्रय हराळे हे होते. प्रमुख वक्ते श्री.दत्तात्रय हराळे यांनी सांगितले की, शरद पवार साहेब हे विकासपुरुष आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले . कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे भारतीय शेतकरी आत्मनिर्भर बनले आहेत . अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना केदार आर. बी यांनी सांगितले की , रयत शिक्षण संस्थेच्या विकासात पवार साहेबांचा फार मोठा वाटा आहे . संगणक शिक्षण काळाची गरज ओळखून पवार साहेबांनी संस्थेत 10 वर्षापूर्वीच संगणक शिक्षण सुरू केले.
विद्यालयात 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर हा सप्ताह कृतज्ञता सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला . यावेळी विद्यालयात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पवार डी.डी.यांनी केले तर आभाराचे काम श्रीमती पवार व्ही. डी यांनी केले.