भगवंतावर मनापासून प्रेम, भक्ती केल्यास भगवंत प्रत्येक संकटाला धाऊन येईल- ह.भ.प.संदीपबुवा मांडके

सांगोला:-भगवंतावर मनापासून प्रेम, भक्ती केल्यास भगवंत प्रत्येक संकटाला धाऊन आल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.संदीपबुवा मांडके यांनी व्यक्त केले.
प्रतिवर्षाप्रमाणे सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव सांगोला ध्यानमंदिर येथील नामसाधना मंडळ यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या नामसप्ताहामध्ये ह.भ.प.संदीपबुवा मांडके बोलत होते.
नारदीय कीर्तनामध्ये सुरुवातीला पूर्वरंगामध्ये समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या बोलावर सदा सर्वदा प्रिती रामी धरावी या वर अतिशय सुंदर निरुपण करत नाही सदा बोलावे भावे गावे जणांशी सांगावे हाचि सुबोध गुरुंचा नामापरते न सत्य मानावे,नामस्मरणाने काय होते अनेक संकटं जरी आली तरी ती लीलया नाहीशी होतात. तेवढी ताकत नामात आहे परंतु ते नामस्मरण घेत असताना आपली तेवढी श्रध्दा आणि भाव असला पाहिजे एकरुप होऊन नामस्मरण केले पाहिजे,आणि तेही सर्वकार्य करता,आपली कर्म करत करत,संसारामध्ये अनेक दुःख आहेत मात्र सुख मात्र कमी आहे,या संसार रूपी सांगतात तरुण जायचे असेल तर नामस्मरण हाच एक कवी युगात पर्याय आहे असे सांगितले.
नंतर उत्तररंगा मध्ये रामभक्त केवट यांच अप्रतिम आख्यान सांगितले, मनामध्ये प्रेम आणि भाव असल्यानंतर कधिनाकधी भगवंत प्राप्ती होतेच,राम वनवासाला जात असताना गंगानदीच पात्र पार करताना केवटांनी रामरायाची कशी सेवा केली आणि पूर्व जन्मीचे पुण्य कसं फळाला आली आणि जन्माच कस सार्थक करुन घेतल.यावर अनेक दृष्टांत दिले, अप्रतिम गायन तितकंच सुंदर निरुपणामुळे सांगोला भाविक तल्लीन होऊन कीर्तन ऐकत होते.
त्यांना साथसंगत तबला ज्ञानेश्वर दुधाणे, हार्मोनियम दयानंद बनकर, पखवाज सुर्यवंशी सर यांनी केली. यापुढील दिवसातही रामनाथ अय्यर यांचे कीर्तन तसेच रविवारी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव सांगोला ध्यानमंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यावेळी सांगोला शहर व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनी उपस्थितीत रहावे असे आवाहन नामसाधना मंडळ व ध्यान मंदिर यांचे वतीने करण्यात आले आहे.